पर्यटनाला चालना देण्यासाठी जेट्यांना मजूरी द्या: खासदार सुनील तटकरें यांची मागणी


टीम म्हसळा लाईव्ह

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरमाला योजने आंतर्गत मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जेट्यांना मंजूरी द्या अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया येथून दरवर्षी ३० लाख प्रवाश्यांची जलवाहतुक होते. वाढत्या प्रवाशी संख्येमुळे येथील पाच टर्मिनल अपुरी पडत आहेत. त्यामुळे रेडीओ क्लब येथे सुसज्ज जेटी बांधण्यात यावी. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सुरु असलेल्या रो रो सेवेतून हजारो वाहनांची ने आण केली जात आहे. यामुळे मांडवा ते अलिबाग येथील रस्त्यावरील वाहतुक वाढली आहे. त्यामुळे मांडवा ते अलिबाग रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे.

मुरुड येथील जंजीरा किल्ल्याला दरवर्षी साडे सात लाख पर्यटकभेट देतात. मात्र किल्ल्यावर उतरण्यासाठी जेटी उपलब्ध नाही, त्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची वाहतुक सुरळीत होण्यासाठी सागरमाला योजनेतून जेटी मंजूर व्हावी, त्याच बरोबर मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ल्यावरही उतरण्यासाठी, रत्नागिरीतील सुवर्ण दुर्ग किल्ल्यांसाठी जेटी मंजूर व्हावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.

त्याचबरोबर कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी जिवना, हर्णे, बोडणी, आगरदांडा येथे सुसज्ज जेटी उभारण्यात याव्यात, यासाठी राज्यसरकारकडून केंद्रांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्याच बरोबर शेततळ्यांमधील मत्स्यपालनाला कृषीउद्योगाचा दर्जा मिळावा अशी मागणी तटकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा