संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरामधील प्रसीध्द अँटो इलेट्रीशिअन कमळाकर उर्फ नाना (बाळशेठ ) करडे यांचे दुःखद निधन आज रवीवार दिनांक ०६/०२/२०२२ दुपारी ३.३० वाजता अल्पशा आजाराने रहात्या घरी निधन झाले. निधना समयी त्यांचे ७४ वय होते. म्हसळा तालुक्यात सामजिक श्रेत्रामध्ये त्यांचे फार मोठे योगदान होते.सार्वजनिक वाचनालय, म्हसळा, त्वष्टा कासार समाज,न्यू इंग्लीश स्कूल म्हसळा ,हिंदू समाज म्हसळा अशा अनेक संस्थांवर ते पदाधिकारी होते.त्यानी अँटो इलेट्रीशिअन या व्यवसायात दाक्षिण रायगड मध्ये प्रचंड दबदबा निर्माण केला होता. त्यानी सुमारे १३० तरुण मुलाना अँटो इलेट्रीशिअन या व्यवसायाचे पूर्ण ट्रेनींग देऊन स्वयं रोजगार देऊन व्यवसायाला सहाय्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुलगे,सून, नात, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे अनेक व्यवसायीक मित्र,ज्ञाती बांधव,श्रीवर्धन,बोर्ली, दिवेआगर ,दिघी, माणगाव, महाड परिसरांतील अनेक मोटर व्यावसिक मंडळीनी पार्थिवाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले उद्या सोमवारी सकाळी ८.३० वाजता म्हसळा येथील अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे.
Post a Comment