संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांत स्थानिक पोलीसांच्या डोळेझाकीमुळे खुलेआम दारु, मटका, जुगार असे अवैध धंदे सुरु आसल्या बाबत सोशल मिडीयावर खुली चर्चा होऊ लागल्यामुळे आणि म्हसळा पोलीसांच्या खबऱ्याना अवैध धंद्याचा सुगावा लागत नसल्याने अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड आलिबाग यांच्या पथकाने गुन्हा नोंदविल्याचे सांगण्यात आले. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय डोंबाळे अन्य सहकाऱ्यानी म्हसळा कुंभारवाडा येथील अलंकार खानावळी चे परिसरांत नाईट महाराष्ट्र या मटका कंपनीचा बुकी महेंद्र , वय ३६ रा. कुंभारवाडा म्हसळा याला रंगेहाथ ताब्यात घेऊन रोख रु ३०४५चा मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतला. या कामगिरी साठीगुन्हे अन्वेषण शाखा रायगड आलिबाग चे पो.ह.विकास खैरनार,अक्षय सावंत,जितेंद्र चव्हाण, पो.ना.अक्षय जाधव, पो.शि.२२५५ फोफसे यानी मदत केल्याचे ठाणे अंमलदार किशोर जाधव यानी सांगितले.
"मोबाइल, इंटरनेट अशा प्रगत माध्यमांचा वापर या धंद्यात होऊ लागल्याने पोलिसांना गुंगारा देणे सोपे झाले आहे. शिवाय मटका खेळणाऱ्यां मध्ये हमाल, मजुरांपासून उच्च शिक्षितां चाही सहभाग वाढू लागला आहे. नेहमीच्या ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाऊ लागल्याने मटका चालतो कोठून हे शोधून काढणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे".
Post a Comment