खरसई मध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व स्वच्छता अभियान



प्रसाद पारावे खरसई
श्रीवर्धन -  निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी म्हसळा तालुक्यातील खरसई येथील सत्संग भवन मध्ये बुधवारी, ता. 23 रोजी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले.  एकूण 100 नागरिकांच्या डोळयांची तपासणी म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सक नलिनी जाधव यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली.

यावेळी रायगड झोन चे प्रमुख प्रकाश म्हात्रे, सेवादल अधिकारी तुकाराम मांदाडकर, शशिकांत म्हात्रे, सहदेव म्हात्रे यांच्या इतर मान्यवर उपस्थित होते. झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले की, भारत देशात मिशनच्या वतीने 16 राज्यात 61 मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यांत आले आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या कालखंडात जेव्हा भारतभर इस्पितळांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा मिशनच्या वतीने वननेस वन परियोजने अंर्तगत 21 ऑगस्ट, 2021 रोजी संपूर्ण भारतात जवळपास 350 ठिकाणी दिड लाखाच्या आसपास वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची देखभाल करण्यासाठी तीन वर्षे दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचाही संकल्प करण्यात आला. 

ते पुढे म्हणाले की, सतगुरु बाबाजींच्या जन्मदिनी मिशन मार्फत 2003 पासूनच स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरु करण्यात आले असून ते सातत्याने पुढे नेले जात आहे. मानव कल्याणाचा त्यांचा दृष्टिकोन हाच होता, की प्रदूषण आतील असो अथवा बाहेरील दोन्ही हानीकारक आहेत. तथापि, यावर्षी कोरोनाची विषम परिस्थिती लक्षात घेऊन मिशनच्या वतीने केवळ जिथे सत्संग भवन आहेत तिथे आणि आजुबाजुच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असे त्यांनी सांगितले. 

सोबत फोटो - खरसई येथे संत निरांकरी मंडळाकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा