प्रसाद पारावे : म्हसळा
संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी दि.२३ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपूर्ण भारतात जवळपास १०० निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यांची वेळ आहे सकाळी १० ते दुपारी २. याशिवाय ज्या नेत्ररुग्णांच्या बाबतीत मोतीबिंदू निष्पन्न होईल त्यांचे ऑपरेशन सरकारी इस्पितळांमध्ये करण्यात येईल. गरजू रुग्णांना मिशनच्या वतीने मोफत औषधे व चश्मे वाटण्यात येणार आहेत ज्यायोगे जास्तीत जास्त नेत्ररुग्ण या शिबिरांचा लाभ घेऊ शकतील.
सर्वांना विदितच आहे, की निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांच्या सान्निध्यात संत निरंकारी मिशनने आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगाला प्रेम, दया, करुणा, एकत्व यांसारख्या उदात्त भावनांशी जोडून भिंतीविरहित जगाची परिकल्पना साकार केली. त्यांनी आपल्या भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच मानवता व प्रकृतीची सेवा करत आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची यप्रेरणा दिली. वर्तमान काळात हीच श्रृंखला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सातत्याने पुढे घेऊन जात आहेत. याच उद्देशाच्या पूर्तीसाठी २३ फेब्रुवारी रोजी ही नेत्रचिकित्सा शिबिरे लावण्यात आली आहेत.
या व्यतिरिक्त कोरोनाच्या कालखंडात जेव्हा भारतभर इस्पितळांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा मिशनच्या वतीने ‘वननेस वन परियोजने अंर्तगत 21 ऑगस्ट, 2021 रोजी संपूर्ण भारतात जवळपास 350 ठिकाणी दिड लाखाच्या आसपास वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची देखभाल करण्यासाठी तीन वर्षे दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचाही संकल्प करण्यात आला.
हेच महाअभियान पुढे घेऊन जात असताना मिशनच्या सेवादारांकडून आजच्या दिवशी 50,000 आणखी वृक्ष लावले जाणार आहेत तसेच त्यांची देखभालही करण्यात येणार आहे. ज्यायोगे प्रदूषणाचा स्तर कमी होऊ शकेल आणि प्राणवायुची निर्मिती अधिकाधिक प्रमाणात होऊ शकेल जो मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे आणि या वृक्षांपासून प्राप्त होतो.
बाबाजींच्या जन्मदिनी मिशन मार्फत 2003 पासूनच स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरु करण्यात आले आले असून ते सातत्याने पुढे नेले जात आहे. मानव कल्याणाचा त्यांचा दृष्टिकोन हाच होता, की ‘प्रदूषण आतील असो अथवा बाहेरील, दोन्ही हानीकारक आहेत.’ तथापि, यावर्षी कोरोनाची विषम परिस्थिती लक्षात घेऊन मिशनच्या वतीने केवळ जिथे सत्संग भवन आहेत तिथे आणि आजुबाजुच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
वरील माहिती संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांनी दिली. या सर्व उपक्रमांचे आयोजन कोविड-19च्या दिशा-निर्देशांचे पालन करत केले जाईल.
या व्यतिरिक्त जल रक्षणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकत पालघर जिल्ह्याच्या आदिवासी तलासरी तालुक्यातील सायवन गावामध्ये घुलुम पाडा येथे तृतीय सिमेंट नाला बांध (CNB) ची निर्मिती करण्यात आली आहे ज्याचे लोकार्पण बुधवार, दिनांक २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी संत निरंकारी मंडळाचे महासचिव आदरणीय श्री.सुखदेवसिंहजी यांच्या शुभहस्ते केले जाईल. यापूर्वीही आदिवासी बांधवांसाठी दोनपप सिमेंट नाला बांधांची निर्मिती मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे, की संत निरंकारी मिशन मानव कल्याणाच्या कार्यामध्ये सदोदित अग्रेसर राहिलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व सशक्तिकरण या क्षेत्रात सेवा करण्यात आली असून हे कार्य निरंतर पुढे जात आहे.
Post a Comment