(म्हसळा प्रातिनिधी)
सालाबाद प्रमाणे यावर्षी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन म्हसळा पंचायत समितीचे उपसभापती संदीप पांडुरंग चाचले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हिरामन परकाळे वि.अ.सा.पंचायत समिती म्हसळा यानी श्री शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी म.फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती महाराष्ट्रात साजरी केल्याचे सांगितले. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता.तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर देशात स्वातंत्र लढा उभारताना पुन्हा शिवजयंती अधोरेखित झाली. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम सुरू केल्याचे आपल्या मनोगतांत सांगितले. यावेळी नंदकिशोर दि. काळे (कनिष्ठ वि.अ.पंचायत समिती म्हसळा ),नरेश ल. विचारे (वरीष्ठ सहा.शिक्षण. पंचायत समिती म्हसळा ), आबासाहेब साळवे, मयूर मधुकर गायकर(उपसरपंच घूम), संभाजी शिवाजी शिंदे, ग्रंथपाल उदय कृष्णाजी करडे, लिपिक दिपाली दातार व अन्य मान्यवरानी श्री.शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
Post a Comment