संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पोलीस स्टेशन अर्तगत ३९ / २०२० भा.द.वि.क.३५४(अ),पोस्को १२ प्रमाणे नोंद झालेल्या गुन्ह्यांत आरोपी विनोद उर्फ बाबू गणेश साळवी वय २८ रा. मांदाटणे या युवकाला ३ वर्ष सक्तमजुरी शिक्षा रु१० हजार दंड,दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा मा.विशेष न्यायालय श्रीमती बनकर यांचे कोर्टांत झाली. शासकीय अभियोक्ता म्हणून अँड.योगेश तेंडुलकर यानी काम चालविले.आरोपी यानी अत्पवयीन ७ वर्षाचे मुलीकडे पाहून स्त्री मनांत लज्जा निर्माण होईल असे अश्लील हावभाव केले होते. सदर गुन्ह्याचा निकाल आज दि.२फेब्रु २२ मा.विशेष न्यायालय माणगाव यांचे कोर्टाने दिला.सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यानी केला होता. तालुक्यातील महिला संघटनानी पोरे यांचे फोन लावून विशेष कौतुक केले.
Post a Comment