शाळा सुरू, बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल : म्हसळा शिवसेनेनी वहातुक सुरू करण्यासाठी विनंती



(म्हसळा प्रतिनिधी)
पनवेल मनपा वगळून रायगड जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा नियमीत सुरू झाल्या असताना विद्यार्थाना शाळेत जाण्या येण्यासाठी एस.टी.परिवहन विभागाच्या बस नसल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत रहात आसल्याने श्रीवर्धन आगार प्रमुखानी अन्य मार्गावर प्रवाशांसाठी एस.टी. बस सुरू केल्या  त्या प्रमाणे ग्रामिण भागातील विद्यार्थासाठी बससेवा सुरु करावी असे कळकळीचे  आवाहन शिवसेना म्हसळा यानी केले. तहसीलदार म्हसळा यांचे मार्फत निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, गजानन शिंदे, अनंत कांबळे, कृष्णा म्हात्रे,अमित महामुनकर,दिपल शिर्के या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी आगार व्यवस्थापक श्रीवर्धन याना निवेदन दिले. शहरांतील वसंतराव नाईक कॉलेज, न्यू इंग्लीश स्कूल म्हसळा,आय.टी.आय. म्हसळा, अंजुमन हायस्कुल या शैक्षणिक संस्थातून तालुक्यातील पाभरे,खारगाव, तुरूंबाडी, मजगाव, जांभूळ, वडघर, पांगळोली, खरसई, गाणी, चांढोरे, चिरगाव, देहेन आदी गावांतून किमान १५०० ते १८०० विद्यार्थी- विद्यार्थीनी शिक्षणासाठी येत असतात असेही सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा