टीम म्हसळा लाईव्ह
नवी मुंबई येथील ऐरोली परिसरातील पटनी जंक्शन येथे परम पूज्य निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे स्मृती शिल्प उभारण्यात आले असून आज शिल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
परम पूज्य निरंकारी बाबा हरदेवससिंह यांनी कायमच सत्य, प्रेम आणि एकात्मता बाळगण्याचा मौलिक सल्ला दिला. मानवाला मानव प्रिय असावा, एकमेकांना एकमेकांचा आधार व्हावा हा संदेश शिरसावंद्य मानून त्यांचे अनुयायी समाजासाठी कायम सेवभावनेने कार्य करत असतात. महाड चिपळूण येथे आलेल्या महापूराच्या प्रसंगी देखील या सेवाभावी वृत्तीचा परिचय आला होता. त्यांची हीच शिकवण समाजात रुजावी, वाढावी यासाठी हे स्मृती शिल्प तयार करण्यात आले असल्याचे यासमयी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेव सिंह जी तसेच महाराष्ट्र ब्राँच प्रशासन प्रभारी मोहन छाबरा जी खासदार राजनजी विचारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले, माजी नगरसेवक एम.के.मढवी, माजी नगरसेवक करण मढवी, माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेवक शैलेश हळदणकर आणि नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी तसेच संत निरंकारी संप्रदायातील बंधू भगिनी उपस्थित होते.
Post a Comment