गुंज संस्थेच्या वतीने भापट येथे किट वाटप



म्हसळा - प्रतिनिधी
दि १६ फेब्रुवारी २०२२ रोजी म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भापट या गावी गुंज संस्थेच्या वतीने किट वाटप करण्यात आले.
गुंज संस्था हि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात कार्यरत आहे. या संस्थेचे पाच जिल्ह्यांचे प्रमुख श्री अविनाश चव्हाण सर, कार्यवाहक प्रतिनिधी श्री मयुर मारूती नाक्ती यांनी भापट ग्रामस्थ यांच्या जवल संपर्कात येऊन संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे समजावून सांगितली . या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली  गावातील  सामाजिक, आवश्यक कामे लोकसहभागातून केल्या ने संस्था जीवनावश्यक वस्तूरूपात सहकार्य करते .
या तत्त्वावर भापट ग्रामस्थ व महिला यांनी या ठरावावर एक मत करून पुढील वाटचालीसाठी भापट ग्रामस्थ यांनी एक हात सहकार्याचा या भूमिकेतून पाऊल उचलले.
भापट गावासमोर अनेक कामांचा विषय चर्चेचा होता .
पाणी अडवा पाणी जिरवा- बंधारा बांधणे, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, स्मशान भूमी स्वच्छता ठेवणे , वाहतुकीची रस्ता
अशा कामांपैकी 
प्रथम दळणवळणासाठी असणारा रस्ता हा १ कि.मी . दगड , माती भराव टाकून लोकसहभागातून गुंज संस्थेच्या माध्यमातून सुव्यावस्थित करण्यात आला. यासाठी महिला व पुरुष यांनी एकजूटीने सहकार्य केले. व सर्व समाज एकत्रीत येऊन श्रमदान केले.
आणि सदर रस्त्याबाबत दळणवळण साठी मार्ग सुख सोईचे झाले यासाठी भापट गाव विकास समिती अध्यक्ष श्री प्रविण ठोंबरे, सेक्रेटरी श्री जयसिंग बेटकर सदस्य लक्ष्मण मोहिते,गजानन पाष्टे, पांडुरंग जाडे, दिलिप गावडे, मोहन भोसले,सत्तार नजिर , रूपेश घडशी, वंदना मोहिते, कोमल मोहिते, राजेश्री बेटकर, रंजिता कुवारे, द्रष्टी अलिम, रूतुजा भोसले, यासाठी गुंज संस्थेचे प्रतिनिधी श्री मयुर मारूती नाक्ती यांचे बहुमोल सहकार्य लाभले आणि भापट ग्रामस्थ व महिला यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मयुर नाक्ती यांनी केले. स्वागत अध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केले. आभार व सुत्रसंचलन जयसिंग बेटकर सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा