वैभव धनावडे लिखित अक्षरबंध हायकू संग्रहास पुरस्कार प्राप्त


टीम म्हसळा लाईव्ह  

       ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (नाशिक ) येथे प्रकाशित झालेल्या,वैभव धनावडे लिखित  "अक्षरबंध " हायकू संग्रहास अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान  ह्यांच्या तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा २०२१ सालचा "अक्षरगंध" पुरस्कार  जाहीर झाला आहे .
   वैभव धनावडे हे अभियंता म्हणून कार्यरत आहेत .मराठी भाषेसाठी झटणाऱ्या विविध भागातील विविध आणि स्तरांतील लोकांना एकत्र घेऊन त्यांनी साहित्यसंपदाची स्थापना केली आहे . राज्यस्तरीय साहित्य संमेलनं ,विविध कार्यशाळा ,साहित्य क्षेत्राशी निगडित असणारे विविध उपक्रमांमध्ये सहभाग आणि यशस्वी आयोजन ह्यात त्यांचा हातखंड आहे .नुकताच त्यांना साहित्य गौरव ,पुणे ह्यांच्या तर्फे त्यांना पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला असून ,साहित्यसंपदाच्या माध्यमातून १२१ तासांचा अखंड काव्यवाचन विश्व विक्रम  आणि इ पुस्तक प्रकाशनाचा राज्यस्तरीय विक्रम त्यांच्या नावे आहे .
साहित्यसेवा करत असताना आपण समाजाचे देणे लागतो ह्या भावनेतून पूरग्रस्तांना ,अनाथालय,वृधाश्रम येथे मदतीचा हात त्यांनी वेळोवेळी दिला आहे . वाचन संस्कृतीस चालना मिळावी म्हणून आदिवासी पाड्यावर वाचनालय स्थापना ,मराठी भाषा संवर्धन आणि भावी पिढीला साहित्याची गोडी लागावी म्हणून संस्कारसंपदा असे अभिनव  उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून पार पडताना आढळतात .
    सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अक्षर संख्येचे बंधन असलेला हायकू काव्यप्रकार त्यांनी लीलया हाताळून ,पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना दिसत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा