संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा येथील वसंतराव नाईक कला ,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात म्हसळा नगरपंचायतीच्या सहकार्याने आणि सांस्कृतिक विभाग आणि वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियाना आणि माझी वसुंधरा आभियानांतर्गत पोस्टर प्रदर्शन,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि माझी वसुंधरा शपथग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री.एम.एस.जाधव सर हे होते तर प्रमुख वक्त्या म्हणुन म्हसळा नगरपंचायतीमधील स्वच्छताविभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग शहर समन्वय श्रीमती प्रियांका राजेंद्र चव्हाण तसेच श्री.सुरेश जाधव स्वच्छता विभाग नोडल आँफिसर,श्री.फरहान साने पाणीपुरवठा विभाग समन्वयक तसेच श्री.सचिन मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी कार्यक्रमचे प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयात स्वच्छ भारत आभियाना अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या पोस्टर्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू बनविण्याच्या स्पर्धा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन या सर्व स्पर्धा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर श्रीमती प्रियांका चव्हाण मँडम यांनी आपल्या भाषणात स्वच्छता अभियानाचा उद्देश आणि महत्त्व सांगताना असे सांगितले कि, स्वच्छता आभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा मध्ये युवकांच्या कल्पना शक्ती ला संधी देणे आणि आपण समाजासाठी काय करतो ? याबाबत वैचारिकता तरूणांमध्ये निर्माण करणे हा असतो. तरुणांना त्याचे गाव तालुका कसा अपेक्षित आहे ?याचे रेखाटन त्यांनी त्याच्यां निबंध आणि चित्रातुन करणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण स्वतः काय करणार आहोत? याविषयी देखील स्वतःच्या मनात खोलवर जाऊन विचार केलात तरच आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धाचा उद्देश साध्य होणार असतो. आपले गाव आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आपल्या मध्ये छोटे छोटे बदल करणे गरजेचे आहे तसेच आपण केलेल्या कच-याची विल्हेवाट आपणच करणे गरजेचे आहे तसे केले तरच आपले गाव आणि शहर स्वच्छ आणि सुंदर. होणार आहे श्रीमती चव्हाण मँडम यांनी आपला हा विचार विविध उदाहरणाच्या साह्याने आणि ओघवत्या वक्तृत्व शैलीने विद्यार्थ्यांना पटवून दिला तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जाधव सर यांनी भावीपिढीच्या विकासासाठी वर्तमान काळात होणारा पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू बनविणे ही काळाची गरज आहे असे मनोगत मांडले त्यानंतर श्रीमती प्रियांका चव्हाण मँडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा याविषयावर आधारित शपथ दिली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या वनस्पती शास्र विभागाच्या प्रयोगशाळेत स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा या विषयावर आयोजित केलेल्या पोस्टर्स प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी वनस्पतीशास्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.सौ.सलमा नजिरी मँडम यांनीसर्वाचे आभार मानले. कुमारी मिनाक्षी जैन,कुमारी किरण राजपुत,कुमारी साक्षी कळस, कु.अवंतिका बोरकर,आणि वनस्पती शास्र विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सहकार्याने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजन केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील नँक समन्वयक प्रा.दुंडे सर आणि सर्व प्राध्यापक,ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी, आणि बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनां उपस्थित होते.
Post a Comment