गटनेतेपदी अनिकेत उर्फ मुन्ना पानसरेंची निवड.


(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत १३ राष्ट्रवादी काँग्रेस २ काँग्रेस आणि २ शिवसेना असे पक्षीय बलाबल आहे. निवडणूक पूर्व काँग्रेस आणि शिवसेना आघाडी होती.निवडणूक पश्चात सुध्दा दोनही पक्षाची आघाडी रहाणार आसल्याचे संबंधीतानी कळविले असल्याने आज म्हसळा शिवसेना कार्यालयात झालेल्या दोनही पक्षाचे बैठकीत गटनेतेपदी अनिकेत उर्फ मुन्ना पानसरेंची एकमताने निवड करण्यात आल्याचे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर यानी सांगितले, कुडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कॉंग्रेसचे नव निर्वाचित नगरसेवक डॉ. मुईज शेख ,नगरसेवीका राखी करंबे , अनिकेत पानसरे,माजी ता.प्रमुख महादेव पाटील,क्षेत्रीय संघटक रवींद्र लाड ,संपर्क प्रमुख गजानन शिंदे,उपतालुका प्रमुख राजाराम तीलटकर,शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी रमेश शेट जैन,युवासेना तालुका अधिकारीअमित महामुनकर ,खारगाव (खु)चे माजी सरपंच बाळा म्हात्रे,प्रसाद बोर्ले,युवा नेते कल्पेश जैन, विभाग प्रमुख बंड्या विचारे,प्रसन्न निजांपुरकर,भाई कांबळे, माजी नगरसेविका संपदा पोतदार, अजय करंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
"काँग्रेस आणि शिवसेना असे आम्ही ४ जण म्हसळा नगर- पंचायतीत सक्षम विरोधक म्हणून म्हसळाकरांचे काम करणार आहोत "अनिकेत पानसरें, नगरसेवक, शिवसेना,

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा