संजय खांबेटे : म्हसळा 
राज्यातील पोलीसाना व त्यांच्या कुटुंबियाना सर्व सोयी सवलती शासन देत असताना सुध्दा म्हसळा पोलीस मात्र अनेक सोयी सवलतींपासून वंचित आसल्याचे पुढे येत आहे. म्हसळा शहरांतील नगरपंचायत हद्दीत ४४ गुंठे जागा पोलीसांच्या स्वताचे मालकीची आहे.परंतु पोलीस स्टेशनसाठी शासनाचे धोरणा नुसार ना कार्यालयीन इमारत ना कर्मचाऱ्याना निवासस्थाने अशी अवस्था व स्थिती आहे. प्रशासकीय वरीष्ठ आधिकारी प्रस्ताव पाठवतात कार्यालयीन पाठपुरावा शिल्लक ठेवत आसल्यामुळे आद्यापही त्याना यश आलेले नसतानाच म्हसळयाचे माजी सभापती महादेव पाटील, रायगडचे खासदार व पालकमंत्री यांजकडे पोलीस स्टेशनसाठी अद्ययावत व सुसज्ज इमारत हा विषय लावून धरणार आहेत. नगरपंचायत हद्दींत म्हसळा शहरांत अत्यंत मध्यवर्ती अशा ग्रामिण रुग्णालया समोर २१ गुंठे जागा असून यात स्वातंत्र्य पूर्व काळा पासून( सुमारे १२५ वर्षापूर्वी ) १४ खोल्यांची निवास स्थान होती, पोलीस खात्याच्या मागणी नुसार २०१३ -२०१४ च्या दरम्यान निवासस्थानांची केवळ दुरुस्ती केली,मात्र ती जागा सद्यस्थितींत पूर्णपणे बेवारस  आहे. म्हसळा ग्रामिण रुग्णालया समोरील२१ गुंठे जागेत प्रशस्त अद्ययावत असे किमान ६ आधिकारी आणि ६० कर्मचारी याना सोयीचे व्हावे असे कार्यालय होण्यासाठी मागणी करणार असल्याचे म्हसळा तालुक्याचे माजी सभापती महादेव पाटील यानी सांगितले. ही मागणी खासदार आणि पालक मंत्र्यांकडे पोलीस आधिकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांसाठी मागणी करणार आहे.म्हसळा नवानगर (TLR ऑफीस शेजारी) येथे आधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बंगला व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानासाठी मोठया प्रमाणात जागा उपलब्ध आसल्याचे पाटील यानी सांगितले भविष्यात निवास स्थानाचा प्रश्न मा.खासदार सुनील तटकरे व पालक मंत्री कु.अदीती तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लागेल.
"राज्यांत मविआघाडीची सत्ता असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्री व वित्तखाते, गृहखाते व पालकमंत्री ही महत्वाची खाती आसल्याने आणि ही समस्या नगरपंचायत, पंचायत समिती यांच्या समन्वयांतून प्रश्न मांडणार आसल्याचे पाटील यानी सांगितले. प्रशस्त कार्यालय झाल्यावर  पोलीस स्टेशनला जास्त मनुष्यबळ व इतर सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात. "
 
 
 
   
   
  
Post a Comment