वेळास-आगर येथे चित्रा वाघ यांची सदिच्छा भेट
भंडारी महिला मंडळाच्या हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग..
वेळास-आगर | संतोष शिलकर
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास या गावी रविवार दि.१६ जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने सदिच्छा भेटीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ यांनी सहभागी होऊन हिंदू संस्कृतीत पवित्र मानल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने वाटल्या जाणाऱ्या हळद आणि कुंकूवाचा वाण घेतांना व गावातील उपस्थित महिला मंडळाकडे संवाद साधतांना महिलांनी बनविलेल्या गूळ आणि तिळगुळाची तारीफ केली. तीळ-गुळाला मकर संक्रांतीच्या सणात अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीवर्धनकडे येतांना खूप बरं वाटलं तुमचं गाव खूप छान आहे.येथील समुद्र किनारा अत्यंत नयनरम्य असा आहे. महिला सक्षमीकरण,महिला संघटन,महिला उद्योग या विषयावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना.काही सहकार्य हवं असल्यास नक्कीच करू असे सांगताना आपल्या समवेत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्या.
वेळास भंडारी समाज महिला अध्यक्षा सौ.सेजल संदेश पेडणेकर,उपाध्यक्षा,सचिव सौ.निशा निलेश पाटील, खजिनदार सौ.प्रिती स्नेहल नाईक यांनी प्रमुख अथीती त्यांच्या समवेत असलेल्या महीला कार्यकर्त्या यांचा शाल,श्रीफळ,आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
याप्रसंगी गावच्या व समाजाच्या वतीने सरपंच आशुतोष पाटील,समाज अध्यक्ष रणजित मुरकर यांनी पाहुण्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांच्या समवेत रायगड भाजपा महिला उपाध्यक्षा श्रेया कुंटे,शितल गांगणे रोहा शहर महिला अध्यक्षा,शर्मिला स्तवे,माणगांव महिला अध्यक्षा मनीषा श्रीवर्धनकर श्रीवर्धन शहर अध्यक्षा,कसूम दोडखुलकर,मनोज गोगटे, नवनीत तोडणकर,तसेच वेळास ग्रामस्थ महिला,जेष्ठ समाज बांधव दिनानाथ उर्फ धोंडू नाईक,किसन रहाटे, अजिंक्य भाटकर,नितेश तोंडलेकर,सुमित पेडणेकर, छायाचित्रकार संदेश पेडणेकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली.महाराजांनी सागरी आरमाराची स्थापना केली त्यावेळी त्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी अर्थात मायाजी भाटकर होते.त्यांनी केलेल्या पराक्रमाची विशेषतः खांदेरी-उंदेरी किल्यावर केलेल्या शौर्याची गाथा सर्वस्थुत आहे.तर मुंबईच्या जडणघडणीत ज्यांचा मोठा सहभाग होता.ज्यांनी मुंबईत,महाराष्ट्रात अनेक ईमारती उभ्या केल्या,ज्यांनी दादर सारख्या भागात आठ एकर जमीन स्वतः खरेदी करून ती स्मशान भूमीकरीता विना मोबदला अर्पण केली ते दानशूर स्वर्गीय भागोजी कीर हे भंडारीच होते.यांचा विशेष नामोल्लेख आपलं मनोगत व्यक्त करतांना संतोष शिलकर यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदास तोंडलेकर यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून स्नेहा कल्पेश मुरकर यांनी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाल्याचे सांगितले.
Post a Comment