म्हसळा नगरपंचायती मध्ये झालेला विजय खासदार,पालकमंत्री आणि पक्ष कार्यकर्त्यांना समर्पित -आमदार अनिकेत तटकरे




म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा नगर पंचयतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आमदार अनिकेत तटकरे यांचेवर जबाबदारी दिली होती त्या नुसार म्हसळा शहरात मागील पाच वर्षे केलेल्या विकास कामांवर विश्वास टाकुन मतदारांनी म्हसळा नगर पंचायतीची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिली या विजयाचा आनंद आणि निवडुन आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन आमदार अनिकेत तटकरे  यांनी केले.या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना हा विजय खऱ्या अर्थाने खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि पक्ष कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले.
मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानताना आमदार अनिकेत तटकरे यांनी खरंतर म्हसळयात राष्ट्रवादी 17/0 ने विजयी होणे अपेक्षित होते.4 ठिकाणी काही कारणास्तव थोडया मोठ्या फरकाने राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहेत तरीही या विजयाचा मोठा गाजावाजा न करता पक्षाचे ज्या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले आहेत तेथील चुका सुधारून पक्षात गद्दारी केलेल्याना थारा दिला जाणार नसल्याची तंबी दिली.म्हसळा शहरातील विकासाला अधिक गती मिळण्यासाठी निधीची कमतरता पडु देणार नसल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्वाही दिली आणि सर्वांचे आभार मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा