Mhasla Nagar Panchayat Election | गड राखला! म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

 
17 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेस-शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा

म्हसळा (सुशील यादव) म्हसळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-शिवसेना युतीच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीने म्हसळा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करुन गड कायम राखण्यात यश मिळवले आहे. तर काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे.

21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 12 प्रभागातील आणि 18 जानेवारी रोजी पार पडलेल्या 4 प्रभागातील निवडणूक मिळून 16 जागांसाठी निवडणूक प्रकिया पार पडली होती. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादीच्या सरोज मंगेश म्हशीलकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. 16 प्रभागात पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 12 तर शिवसेना 2 व काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

आज (19 जानेवारी) निकालाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे, सहाय्यक निवडणूक अधिकारी मनोज उकिर्डे यांनी सकाळी 10 वाजता मतमोजणीची प्रक्रिया वेळेत सुरु करुन अवघ्या दीड तासात सर्व निकाल जाहीर केले. याकामी म्हसळा पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
म्हसळा नगरपंचायत निवडणुकीचा प्रभाग निहाय निकाल खालीलप्रमाणे :
  
प्रभाग क्रमांक 1 :
कमळ रविंद्र जाधव - 55 मते (राष्ट्रवादी) विजयी
कमळी पवार - 37 मते (काँग्रेस आय) पराभूत
नोटा - 10
--------------------- 
प्रभाग क्रमांक - 2
संजय यशवंत दिवेकर - 221 मते (राष्ट्रवादी) विजयी
प्रविण विनोद बनकर - 87 मते (शिवसेना) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 3
मेहजबिन नदीम दळवी - 231 मेत (राष्ट्रवादी) विजयी
मिनाज शहजाद कादिरी - 60 मते (शिवसेना) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 5
नौसीन सलीम चोगले - 197 मते (राष्ट्रवादी) विजयी
यास्मिन इम्रान मुंगये - 97 मते (काँग्रेस आय) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 6
असहल असलम कादिरी -225 मते (राष्ट्रवादी) विजयी
जहुर हुर्झुक - 160 मते (काँग्रेस आय) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 7
बशारत फरहीन अ.अझीज - 115 मते (राष्ट्रवादी) विजयी
पेणकर हीबा अब्दुल नईम - 68 मते (काँग्रेस आय) पराभूत
इतर - 03 - पराभूत
---------------------
प्रभाग क्रमांक - 8
सुमैय्या कासम आमदानी - 164 मते (राष्ट्रवादी) विजयी
खतीब गुहेर मतीब - 100 (काँग्रेस आय) पराभूत
इतर - 01
---------------------  
प्रभाग क्रमांक - 9
उकये अब्दुल रहीम शाहिद - 89 मते (राष्ट्रवादी) पराभूत
डॉ. मोईज शेख - 197 मते (काँग्रेस आय) विजयी
इतर -01
---------------------  
प्रभाग क्रमांक - 10
मुबिन दाऊद हुर्झुक - 103 मते (राष्ट्रवादी) पराभूत
सुफियान इकबाल हलदे - 106 मते (काँग्रेस आय) विजयी
इतर - 02
---------------------  
प्रभाग क्रमांक - 11
म्हसलाई सारा अब्दुल कादिर - 160 मते (राष्ट्रवादी) विजयी
करदेकर नाझीमा महमद - 108 मते (काँग्रेस आय) पराभूत
घरटकर अफरीन - 49 मते (शेकाप) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 12
शाहिद सईद जंजिरकर - 127 मते (राष्ट्रवादी) विजयी
रविंद्र नामदेव दळवी - 126 मते (काँग्रेस आय) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 13
कविता शितल बोरकर - 109 मते (राष्ट्रवादी) पराभूत
राखी अजय करंबे - 144 मते (शिवसेना) विजयी
---------------------  
प्रभाग क्रमांक - 14
संदिप रमेश बरटक्के - 01 मत (राष्ट्रवादी) पराभूत
अनिकेत दिलीप पानसरे - 57 मते (शिवसेना) विजयी
सचिन करडे - 43 मते (भाजप) पराभूत
निकेश ओमप्रकाश कोकचा - 34 मते (अपक्ष) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 15
जयश्री चंद्रकांत कापरे - 74 मते (राष्ट्रवादी) विजयी
निता प्रसाद बोर्ले - 61 मते (शिवसेना) पराभूत
सरिता संतोष पानसरे - 49 मते (भाजप) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 16
संजय प्रभाकर कर्णिक - 327 मते (राष्ट्रवादी) विजयी
राजकीरण दत्ताराम खताते - 114 मते (शिवसेना) पराभूत
प्रसाद अशोक पोतदार - 19 मते (भाजप) पराभूत
---------------------  
प्रभाग क्रमांक - 17
सुनिल गणपत शेडगे - 280 मते (राष्ट्रवादी) विजयी
शरद हिरामण चव्हाण - 61 मते (भाजप) पराभूत
मिथुन चांदोरकर - 46 मते (शिवसेना) पराभूत
---------------------


प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये काँग्रेसने आपल्या जागा राखल्या आहेत. येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मोईज शेख यांनी राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते शाहिद उकये यांचे चिरंजीव अब्दुल उकये यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.
 
तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसच्या सुफीयान हलदे यांनी राष्ट्रवादीचे मुबिन हुर्जूक यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला आहे. तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादीचे शाहिद जंजिरकर यांनी काँग्रेसचे तालुका सचिव रविंद्र दळवी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आहे. या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक पहायला मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा