शिवसेना बोर्लीपंचतन जिल्हा परिषद गट फुटीच्या उंबरठ्यावरती


पक्षश्रेष्टींनी खालील बातमीचा आढावा घेऊन लवकरात लवकर पावले उचलावी जेणेकरून जुने जाणते कडवट शिवसैनिक म्हणजेच आपले कुटुंब टिकवता येईल.... 

शिवसेना बोर्लीपंचतन जिल्हा परिषद गट फुटीच्या उंबरठ्यावरती . इती - सुकुमार तोंडलेकर, श्यामकांत भोकरे.


बोर्लीपंचतन. ( श्रीनिवास गाणेकर )

श्रीवर्धन मतदार संघातील बोर्लीपंचतन या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये माझी, पत्नीची ईच्छा नसतानाही शिवसेना पक्ष, मतदारांच्या ईच्छेखातर लढलो आणि जिंकलो. शिवसेना जन्माला आल्यानंतर शिवसेनेने या विधानसभा मतदारसंघात विधानसभेची हँट्रीक मारलेली आहे मात्र या बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या गटात विजय संपादन केले नाही. २०१७ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच जिंकली मात्र वरिष्ठ नेते मुख्यमंत्री आपला असतानाही विकास कामांना कोणताही निधी न दिल्याने शिवसेना पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावरती निर्माण झाला असल्याची खंत श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती तथा उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर आणि उपजिल्हाप्रमुख श्यामकांत भोकरे यांनी समस्त पदाधिका-यां समोर व्यक्त केली.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या जिल्हा परिषदेच्या गटातील शेखाडी, भरडखोल, दिवेआगर, खुजारे, कार्ले, वांजळे, कोंडेपंचतन, बोर्लीपंचतन, कापोली, शिस्ते, भावे, वडवली, वेळास, आदगांव, सर्वे, नानवेली, मणेरी, दिघी, कुडगांव, हरवीत विभागातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविका मध्ये अनिल पवार म्हणाले की मी मुख्यमंत्री सोडून सर्वच वरीष्ठ नेतेमंडळी, मंत्र्यांना भेटलो आहे तरीही साधे सभामंडप वा वेळास, आदगांव, सर्वे नानवेली करीता रातराणी बस मागणी केली असता तेही होऊ शकले नाही.

वडवली येथील निखिल कांबळे म्हणाले की तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित असतानाही आपण मागे आहोत याचे वाईट वाटते.२०१७ मध्ये जिंकण्यासाठी मेहनत घेतली परंतु कामे काहीच नाही. श्रीवर्धन मतदार संघ कोणाला बहाल केला आहे की काय असाही प्रश्न उद्भवत आहे. उद्योगमंत्री सतत दुसरा टर्म असतानाही किती मुले कामाला लागली. मुख्यमंत्री आपला बसला की कामे होतील असे यापूर्वी बोलत होते मात्र तसे काही होत नाही. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर पोटनिवडणुकीत सर्वीकडे काँग्रेस आली होती तेव्हा उधळलेला घोडा अडविण्याचे काम या मतदारसंघाने केले. तुकाराम सुर्वे सारख्या सामान्य शेतकऱ्याला हा मतदारसंघ आमदार बनु शकतो त्या मतदारांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी वा-यावर सोडले आहे.

विधवा झालेली शिवसेना हिरव्या बांगड्या भरलेल्या सारखी वाटत असुन लग्न ज्यांच्याशी झाले त्यांच्याशी नीट पटत नसुन नीट बोलत नाही. वाघाची डरकाळी फोडणारा पक्षाची हालत फार बिकट झाली असल्याची घणाघाती टिका कुडगांवचे कट्टर शिवसैनिक एजाज भाई हवलदार यांनी केले. ते पुढे म्हणाले की २०१७ पासून आमच्या गावात एकही काम झाले नाही. पंचायत समितीचे काम फक्त दिघीलाच जातात. शिवसेनेच्या अशा वागण्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस फोफावला आहे. आमच्याच लोकांनी गद्दारी केल्यामुळे आमदार निवडून आला नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेचा.दिघी पोर्ट उद्योगमंत्री यांच्या अधिपत्याखाली पण कामांचा ताव भलताच माणूस करतोय. डिसीपीचा निधी आपलेच तीन आमदार पळवतात तर निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मतदारांना तोंड कसे दाखवणार याचा पाढाच वाचला.

आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना श्रीवर्धन पंचायत समीतीचे माजी सभापती, उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर म्हणाले की २००७ मध मी उपसभापती, सभापती झालो तेव्हाचा सभापती आणि आजचा सभापती जमीन आसमानचा फरक आहे. ईच्छा नसतानाही मतदारांच्या आग्रहाखातर निवडणूक लढलो आणि जिंकलो. पहिल्यांदाच हा जिल्हा परिषदेचा गड जिंकलो परंतु पक्षाने उचलून धरला नाही.जिल्ह्यात नियोजनात शिवसेनेच्या वाट्याला दरवर्षी ३२ कोटीचा निधी असतो यातील पाच वर्षात काहीच निधी न दिल्याने मी रायगड मधील तिन्ही आमदार, मंत्री सुभाष देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री सत्तार, यांचीही भेट घेतली, संम्पर्क प्रमुख सदानंद धरवल यांचीही भेट घेतली मात्र काही उपयोग झाला नाही. शिवसेनेचा श्रीवर्धन मतदारसंघ हा मोडायला काढला आहे अशी ईच्छा रायगडाच्या सर्वच प्रमुख नेत्यांची असल्याचे सांगितले.

श्रीवर्धन मतदार संघाचे उमेदवार श्री. विनोद घोसाळकर यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या नोकरी निमित्ताने भेटायला गेलो असता उलट आमच्या वरती आगपाखड केली की मी कुठे कमी पडलो.शिवालयात अक्षरशः भिकारी सारखा फिरलो परंतु कायमस्वरूपी तोंडाला पाने पुसण्यात आली.एकनाथ शिंदे यांची भेट रात्रीच्या वेळेत फक्त दहा मिनिटे दिली तेव्हा ठरले की आदित्य ठाकरे यांच्या दालनात आठ दिवसांत चर्चा करायचे ठरले.आठ आठ दिवस असे करून दोन महिने झाले मात्र काही झाले नाही फक्त वाईट अनुभव वाट्याला आले.
ते पुढे म्हणाले की प्रत्येक ठिकाणी वाईट अनुभव पहायला मिळाला आहे. आमदार भरतशेठ गोगावले श्रीवर्धन मध्ये पहात नाही, आमदार महेंद्र श्रीवर्धन मध्ये पहात नाही आमदार महेंद्र थोरवे श्रीवर्धन मध्ये पहात नाही कारण या आमदारांनी श्रीवर्धन मतदारसंघात लक्ष दिले तर तिकडे तटकरे त्यांच्या मतदारसंघात लक्ष देतील अश्या दृष्टिकोणातुन श्रीवर्धन मतदारसंघाची वाताहात करुन टाकली आहे. विकासकामे करायला गेलो तर मला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करुनही कोणताही निधी मिळत नसल्याने तसेच वरिष्ठांनी लक्ष न दिल्याने मी उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे सांगीतले व नंतर त्यांना गहिवरून आले.

उपजिल्हा प्रमुख श्यामकांत भोकरे म्हणाले की दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य होतो.मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा माझ्या समोर अनेक पक्ष होते मात्र या तालुक्यात शिवसेना बलाढ्य पक्ष आहे, सुकुमार तोंडलेकर  चांगला पक्ष बांधणी करतो म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला.डोळ्याचे आँपरेशन असतानाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची जागा निवडून आणली. न भुतो न भविष्यती असा विजय संपादन केला.खुप निधी येणार असे आम्ही आशा बाळगलो परंतु पदरी निराशा पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर महाविकास बिघाडी केली.शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यावरती तोफ डागुन आपले मत व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा