संजय खांबेटे : म्हसळा
ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडर पेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात तीचा भावही सामान्य ग्राहकाना परवडेल असा ८०- १०० प्राति किलो आहे.
सध्या म्हसळा भाजी बाजारात जांभळ्या, हिरवट, पांढऱ्या रंगाची वांगी, लालबुंद अशी रसरशीत, पाणीदार गाजर,पिवळे धमक लिंब,हिरव्या वाटा ण्याच्या शेंगा (मटार), मेथी, कांदापात, कोथिंबीर यांचा मोहक हिरवा रंग, कोबी, फ्लावर, भोपळी मिरची, भेंडी, गवार, फरसबी, शेवगा शेंगअशा वेगवेगळ्या भाज्या व फळे सध्या हिवाळ्यातील खास आकर्षण बनल्या आसतानाच म्हसळे येथील जुने व अनुभवी भाजी व्यापारी अशोकशेट अडागळे यांनी आपल्या भाजी गाळ्यात खास आकर्षण ठरणारी ओली हळद ही भाजी बाजारात ग्राहकाना चांगलीच आकर्षीत करीत आहे. ग्राहक आलं -मिरची घेण्या साठी जातो तेव्हा तिथे आल्याच्या शेजारी आल्या सारखीच दिसणारी ओली हळद आपलं लक्ष वेधून घेते. ओली हळद घेऊन काय करायचं,ओल्या हळदीनं काय होतं हेच अनेकींना माहित नसतं.घरातील जेष्ठ व्यक्ती मात्र कोणी बाजारात जात असेलतर हिवाळ्याच्या दिवसात ओली हळद आणा यलाच लावतात हिवाळ्या तील लोणच्यांपैकी हळदीचं लोणचं बर्याच घरात घातलं जातं.किमान लोणच्याच्या निमित्तानं का होईना ओली हळद पोटात गेली पाहिजे असा या जेष्ठ व्यक्तींचा आग्रह असतो.
"ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडर पेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा ही धडपड कुटुंबातील जेष्ठ मंडळी नेहमीच करतात, ओली हळद आठवणीने आण हो असं आवर्जून सांगण्या मागे हाच उद्देश असतो"
-विलास यादव( निवृत्त गुरुजी)
"हळदीचे छोटे काप किंवा किसून हळद,आलं आणि मिरची व आवश्यकतेनुसार लिंबू असे लोणचे छान होते"
करडे काकू
Post a Comment