श्री कृष्ण यादव गवळी समाज संघटना रायगड जिल्हा "दिनदर्शिकेचे" खासदार सुनिल तटकरे यांचे शुभहस्ते प्रकाशन




● समाज बांधव संघटित होवून समाजहितासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक - खासदार सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

यादव - गवळी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आदि सर्वांगीण उन्नतीसाठी समाज नेते लक्ष्मण कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संघटीत झालेल्या रायगड जिल्हा श्री कृष्ण यादव गवळी समाज संघटनेच्या सन 2022 चे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवारी दि.09 जानेवारी 2022 रोजी खासदार सुनिल तटकरे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. 
   मौजे सुतारवाडी येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील समाज बांधव संघटित होवून समाजहितासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले. समाजाचे नावाने प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका हि कालनिर्णय दिनदर्शिकेच्या दर्जाची असल्याचे आवर्जुन उल्लेख करताना गवळी समाजातील सर्वच घटकाला संघटीत करून जिल्हा समाज संघटनेची मदत होईल असे काम करीत रहावे या करिता मनोभावे शुभेच्छा दिल्या. मुंबई सारख्या शहरात गोरगरिबांना मदत होईल ह्या उद्देशाने आपण विशेष करून तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्रपणे दोन माणसांची नेमणुक केली असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली. तसेच समाजातील तरुणांनी उच्चशिक्षित व्हावे आणि वेगवेगळ्या उच्च पदांवर काम करावे, समाज संघटनेचे माध्यमातून गरीब, गरजूंचे प्रश्न, अडचणी मांडून त्या सोडविल्या पाहिजेत, सामाजिक प्रश्नांची दखल घेऊन तातडीने कसे सोडवता येतील याबाबत विचारविनिमय झाले पाहिजे. भगवान श्रीकृष्णानी दिलेल्या विचार आत्मसात करून समाजहितासाठी पुढाकार घेऊन समाजातील सर्वच घटकांना व्यापक दृष्टिकोन ठेवून संघटित आणि भक्कम विचारांची संघटना उभी राहिली पाहिजे असे सांगून रायगड जिल्ह्यात गवळी समाज संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय व वसतिगृह असावे अशी मागणी कार्यकारी मंडळाने माझ्याकडे केली आहे त्या कामी शासन स्तरावर आवश्यक लागणारे सहकार्य मी करेल असे खासदार सुनिल तटकरे यांनी मंडळाला आश्वासीत केले. 


दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष चंद्रहास मिरगळ, उपाध्यक्ष सुभाष महाडिक, सचिव तुकाराम महाडिक, सचिव अशोक काते, खजिनदार लीलाधर रिकामे, सह खजिनदार दामोदर काते, सदस्य मोहन लाड, शरद खेडेकर, घनश्याम तटकरे, प्रशांत गोपाळे, अजित खेडेकर,सल्लागार तुकाराम खेडेकर,मारुती कासार गुरुजी,कृष्णकांत लाड,तुकाराम साबळे,कृष्णा तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अशोक काते यांनी केले तर आभार तुकाराम महाडिक यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा