आज दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजता म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयाला खालापूर तालुक्यातील शिक्षक भारती टिम ने भेट दिली.
या समावेत महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे उपाध्यक्ष मा.श्री. विनोद जी कडव सर आणि सर्व खालापूर शिक्षक टिम तसेच माणगाव चे विजय शिंदे सर उपस्थित होते.
उपस्थित टिम चे स्वागत श्री अमित महागावकर सर यांनी केले.
साने गुरुजी बालभवन वाचनालय या वाचनालयाची उभारणी व सध्य स्थीतीची माहिती संयोजक श्री जयसिंग बेटकर सर यांनी दिली.
यावेळी उपस्थित टिम यांनी भापट वाचनालय कार्याचे कौतुक केले.
उपाध्यक्ष कडव सर यांनी राष्ट्र सेवा दल यांची कामाची पार्श्वभूमी सांगितली आणि साने गुरुजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
तसेच भापट या वाचनालयाचा परिसरातील ५/६ गाव लाभ घेत आहेत. याबाबत विशेष अभिमानास्पद गोष्ट आहे असे वर्णन केले.
ईतर ही शिक्षक भारती चे शिलेदार यांनी आपले विचार मांडले.
या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार श्री दिलीप शिंदे यांनी मानले.
Post a Comment