घोणसे घाटात आयव्हा ट्रकला अपघात : अपघाताची नोंद नाही



संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा तालुक्यातील अपघातग्रस्त घोणसे घाटांत नुकताच २५टनी आयव्हा ट्रकला अपघात झाला. MH14 C.P3537 हा१० टायरचा रिकामा २५टनी आयव्हा ट्रक माणगाव बाजूकडून दिधी पोर्टला जात असता केळेवाडीच्या वळणावर घोणसे घाटातील शेवटच्या तीव्र उतारांत म्हसळयाच्या दिशेला न जाता सरळ जाऊन शेतात पडला.
दैव बलवत्तर म्हणून  म्हसळयाचे दिशेने कोणतेही प्रवासी वाहन यावे वेळी आले नाही,या शेवटच्या मोरीवर (छोटा पूल)अनेक वेळा वाहनाच्या गतीने वाहन फेकले जात असल्याचे  चालकानी सांगितले."पुणे -पौड- मुळशी- ताम्हीनी- माणगाव- दिघी" या स्टेट हायवेचे अपग्रेडेशन करून NH 753F या नावे राष्ट्रीय महामार्ग घोषीत केला, मार्गावरील अनेक भागातील नागमोडी वळणे आणि उताराची तीव्रता कमी करणे महत्वाचे होते असे जाणकारांचे मत आहे.स्टेट हायवेचे अपग्रेडेशन राष्ट्रीय महामार्ग असे होऊनही घोणसे घाट "अपघात प्रवण क्षेत्र" शिल्लक आहे. घोणसे घाटातील अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट महामार्ग प्राधिकरण काढूच शकले नाही असे स्पष्ट होत आहे. या ५०० मीटर परीसरांत मागील काही वर्षात अनेक अपघात झाले."जुन्या घोणसे घाटांत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले होते. शिवाय अनेकजण जायबंदी देखील झाले होते. आता हे दोन्ही ब्लॅकस्पॉट नष्ट न झाल्याने त्याची गंभीरता दाखवत आहेत.

"अब्जावधी रुपये खर्च करूनही सदर राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताची नोंद होणे गरजेचे आहे. यामध्ये रस्त्यांचे बांधकाम सदोष असू शकेल, नाहीपेक्षा वाहनांत तांत्रिक बिघाड असू शकतात चुकीच्या अगर सदोष कामातील त्रुटी दूर करण्यासाठी अपघाताची नोंद होणे महत्वाचे आहे"



अपघाताचे फोटो व सदोष मोरी(छोटा पूल) दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा