संजय खांबेटे : म्हसळा
महाराष्ट्र राज्यात होवू घातलेल्या 135 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक निकाल 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाला.आता नगर पंचयतीवर अध्यक्ष व उपअध्यक्ष पदासाठीची निवडणूक कार्यक्रम शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 ते 10 फेब्रुवारी 2022 रोजी पर्यंत जाहीर करण्यात आला आहे. मा.रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांची नेमणुक झाली आहे. म्हसळा नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक व विशेष सभा कामकाज जाहीर झाले नुसार शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे याच दिवशी दुपारी 4 नंतर अर्जाची छाननी होणार आहे.दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत नामनिर्देशन फेटाळणे याच दिवशी पीठासीन अधिकारी यांचे निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा कालावधी सायंकाळी 5 पासुन मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 पर्यंत आहे.सायंकाळी 5 नंतर वैद्य नामनिर्देशन पत्राची यादी सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.दुपारी 4 नंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता अध्यक्ष पदासाठी निवडणूक विशेष सभा होईल या सभेत निवडणूक लढविणाऱ्या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे विशेष सभेत वाचुन दाखवणे,दुपारी 12.5 नंतर अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याचे म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले.
Post a Comment