(म्हसळा- प्रतिनिधी)
दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२२ हा पंधरवडा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो.म्हसळा शहरात तालुका महसूल विभाग,शिक्षण विभाग,सार्वजनिक वाचनालय आणि विविध शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून शुक्रवार दि.२८ जाने.रोजी वाचनालयाचे हॉल मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोह संपन्न झाला.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सामिर घारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वसंतराव नाईक कॉलेजचे मराठीचे प्रा.दिगंबर टेकळे,स.पो.नी.उध्दव सुर्वे,सभापती छाया म्हात्रे,वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य प्रा.माच्छिंद्र जाधव,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, शाहीन केजीचे डॉ.मुब्बशीर जमादार, केंद्र प्रमुख किशोर मोहिते,सुर्यवंशी, पाटीलसर,प्राचार्य तांबे सर, वन विभागाचे सुर्यतळ,अतुल अहिरे, श्रीमती प्रियांका चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात तहसीलदार सामिर घारे यांनी शासनस्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम गावाची तालुक्याची संस्कृती विकसीत करीत असते, मा.जिल्हाधिकारी साहेबानी सुरु केलेल्या यूपीएससी,एमपीएससी च्या गरुडझेप अंर्तगत कार्यक्रमालाही म्हसळयातून चांगली साथ मिळत आहे असे सांगीतले.यावेळी तहसीलदार समीर घारे यांनी म्हसळाकर निर्सगाच्या सानिध्यात आहेत, तो निसर्ग सर्वांनी वाचायला शिकले पाहीजे असे आभ्यासू पणे सांगून निसर्गावर आधारीत स्वरचीत कविता (उन- पाऊस) घारे यानी सादर केली. स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षांत सार्वजनिक वाचनालयाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबवित असतानाच आज भाषा संवर्धन पंधरवडा समारोह , त्यामध्ये ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रदर्शन,स्वरचित कवितांचे वाचन अशा स्वरूपाचा कार्यक्रम होता ग्रंथ दिंडींचा मार्ग तहसील कार्यालय ते सार्वजनिक वाचनालय म्हसळा असा होता, पालखीचे मार्गात येणाऱ्या म्हसळा पोलीस स्टेशन,वनविभाग,नगरपंचायत, केंद्र शाळा,तहसीलदार निवास स्थान, पंचायत समिती, एकात्मिक बालविकास केंद्र या कार्यालयाचे माध्यमातून दिंडीचे स्वागत केले व पालखीतील ग्रंथांचे पूजन करण्यात आले,सार्वजानिक वाचनालयामध्ये पालखीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी ८ विद्यार्थानी स्वरचीत कवितांचे वाचन केले.विविध साहीत्य उपक्रम,छोटी मोठी कवि संमेलन, लेखक आपल्या दारी असे कार्यक्रम भविष्यात आयोजण्याबाबत या वेळी निश्चित करण्यात आले.
Post a Comment