Tala Election | तळा नगरपंचायत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : आता निकालाकडे लक्ष.




तळा :किशोर पितळे:जिल्ह्यात सर्वात लहान पण जास्त चर्चेत असलेली तळानगरपंचायतीची निवडणूक चार मतदान केंद्रावर पार पडली ,सर्व मतदान केंद्रावर शांततेत व पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली असून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७२ टक्के मतदान झाले होते, प्रभाग क्रमांक १४ वगळता कोणत्याही मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून आलेले नाही तळा नगरपंचायत निवडणुकीत चार जागेंसाठी शिवसेनेचे४,राष्ट्रवादीचे ४,शेकाप२ उमेदवार ,भाजप १ उमेदवार व अपक्ष ३ उमेदवार असून १४ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. मात्र सर्वच पक्षाचे उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे असल्यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर डेरे दाखल झालेले होते ,प्रत्येक वार्ड मध्ये मतदार कमी आणि पक्षाचे कार्यकर्ते जास्त दिसत होते. दुपारी दिड वाजेपर्यंत ६२.८८ टक्के मतदान झाले तर साडेतीन वाजेपर्यंत७२.१८टक्के  मतदान झाले होते. सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही,दुपार नंतर ही काही मतदार कुणाकडून काही अर्थिक लाभ मिळेल का या आशेवर मतदार मतदान करण्याला उशीर लावत होते अशी चर्चा सुरू होती, कारण या निवडणुकीमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या,अनेकांना लक्ष्मीचे दर्शन झाले काहीपक्षाच्याउमेदवारांनी यानिवडणुकीसाठीलाखोंचा खर्च केला असल्याचे खासगीत बोलले जात आहे, या पडद्या   मागील राजकारणामुळे अनेक चांगल्या उमेदवाराचे गणित बिघडणार असल्याचे चिन्ह आहे. मतदारांनी नेमका कौल कोणाला दिलाहे उद्या सकाळी मतमोजणीत स्पष्ट होईल सध्यातरी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट चिन्ह आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा