तळा (किशोर पितळे)
तळा येथील नवसाला पावणारी आणि तळेवासियांची श्रध्दास्थान असलेली श्रीचंडिका ग्रामदेवी उत्सव सोहळा ता.१६/१७ जानेवारी२२ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला तळा तालुक्यातील बारा वाड्यांचे हे ग्रामदेवता मंदीर शहरांतीलअठरा वतनदार पगड जाती या मंदीर सोहळ्यात समाविष्ट होत असतात देवीचा अभिषेक पुजा अर्चा होम हवन षोडशोपचार पुजा आणि सर्व गावातुन वाजत गाजत येणारे पालखी सोहळा हळदी कुंकू समारंभ हे जणु गावातीलआगळी वेगळीपर्वणीच. ढोल ताशांच्या गजरात बारा वाडयांतील पालखी आपल्या मुख्य चंडिका मातेच्या मंदिरात पोहचतात फुलांनी सजवलेल्या पालख्या पारंपारिक वेश परिधान करुन भक्तगण हातात भगवे झेंडे आणि खांद्यावर पालखी घेत ढोल ताशांच्या गजरात मंदिराकडे रवाना होतात.या वर्षी आनंदवाडी ग्रामस्थांना यजमान पद देण्यात आले होते.प्रतीवर्षा प्रमाणे दैवज्ञ समाजचे वतीने श्रीचंडीकादेवीच्या महापुजे साठी सौ.व श्री शेखर वेदक श्रीगणेश पुजन सौ.व श्री रमेश सकपाळ व नवचंडीयाग सौ.शुभांगी व श्री संतोष पेलणेकर आनंदवाडी यांच्या हस्ते करण्यात आली. नवचंडी याग,षोडपोचार पुजा पौराहित्य संजय केळकर (गुरुजी सहकारी) पौराहित्य केले यामुळे संपुर्ण परिसर भक्तीमय होऊन गेला होता.मंदिरासमोर भक्तांसाठीभव्यप्रांगणातउभारलेले मंडप भक्तांनाआकर्षीत करून घेत होते.आकर्षक रंगरंगोटी, संरक्षक भिंतीना शोभनीय संदेश फलक खास आकर्षण ठरले. प्रशस्त पुरुष,लेडीज प्रसाधनगृह, सभामंडप विस्तीर्ण परिसर अतिशय शोभनीय असून भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठीलागलेल्याभाविकांच्या रांगादेवीच्यामिळालेल्यादर्शनामुळे आनंद, प्रसन्नता यावेळी दिसून येत होती देवीच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाची सोय केली जाते.परंतु कोरोनाच्या पाश्वभुमिवर नाईलाजाने यावेळी नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. इतर सर्व कार्यक्रम रद्द केले.महाप्रसादाचे ऐवजी लाडू प्रसाद म्हणून देण्यात आले.असंख्य भाविक आवडीने आनंदाने भक्तीभावाने चंडिका मातेचे दर्शनघेण्यासाठी येत असतात यामध्येतळा शहरातील शाळा,काँलेज महाविद्यालय आयटीआय काॅलेज येथील विद्यार्थी, शिक्षक वर्ग,व्यापारी, डाॅक्टर्स,पत्रकार प्रतीष्ठीतमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितअसतात. भाविकांची श्रध्दा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तीमय होऊन गेला होता पुर्वापार या मंदिरात वतनदारांना मिळत असलेला पुजेचा अधिकार व संपूर्ण वाड्यांना पुजेचा लाभ धार्मिक पंरपरा जतन करुन ठेवणारी ही श्री चंडिका भवानी मंदिर ट्रस्ट उत्सव सोहळा आगळा वेगळा साजरा होत असतो.
नवसाला पावणारी श्री.चंडिका अशीख्याती असून दैवज्ञ(सोनार) समाजपारंपारिक पद्धतीने करीत असत.परंतु कालपरत्वे हा पुनःदर्शन सोहळा गावकऱ्यांनी करण्याचे ठरले.२०१३साली मुर्तीला वज्र्यलेप करूनपौष चतुर्दशी ते पौर्णिमा या दोन दिवशी साजरा करण्याचे ठरले यंदा हे दहावे वर्ष आहे.अतीशय शिस्तबद्ध,धार्मिकपध्दतीने,पावित्र्य,सामाजिकसलोखा बंधुत्व सर्वधर्म समभाव जपून बारा वाड्यातीलभक्तश्री.चंडिकादेवीचा ग्रामोत्सवसोहळाअत्यंत उत्साहात पार पडत असतात या उत्सवाची तालुक्यातील बारा वाड्यातील सर्व धर्मातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबई उपनगर, ठाणे पुणे येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात दोन दिवस हा उत्सव असतो .
महेंद्र बा.कजबजे-चंडिका देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष .
Post a Comment