म्हसळा नगरपंचायत निवडणूक उर्वरित चार वार्डात 74.69% मतदान
म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
दिनांक १८जानेवारी २०२२ रोजी म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रं.२,७,८,९ नगरपंचायत निवडणूकिसाठी मतदा्रांमध्ये दुपारी १.३० वा. पर्यंत उत्साह खूप कमी असल्याचे टक्केवारीवरून दिसत होते. सकाळी ११.३० वा. पर्यंत ३३.४९% एवढेच मतदान झाले होते. मात्र त्यानंतर मतदानाचा वेग थोड्या प्रमाणात वाढला होता. दुपारी १.३० वा. पर्यंत ५१.७५ % मतदार झाले होते.तर दुपारी ३.३० वा. पर्यंत ६१.५३ %मतदान झाल्याची नोंद आहे.
पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रांत अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार समिर घारे आणि त्यांच्या सर्व सहकारी वर्गाने मतदान प्रक्रिया सुरळीत पणे हाताळली असून कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
वार्ड क्र.२ मधील एकूण ४१८ मतदारणापैकी ३१२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.१७२ स्त्रिया आणि १४० पुरुष, एकूण टक्केवारी ७४.६४%. वार्ड क्र.७ मध्ये एकूण २८६ मतदारंपैकी १८६ मतदारांनी मतदान केले, त्यामध्ये ९० स्त्रिया आणि ९६ पुरुष मतदार, एकूण टक्केवारी ६५.०३%., वार्ड क्र.८ मध्ये एकूण ४०० मतदारंपैकी २६५ मतदारांनी हक्क बजावताना त्यामध्ये ९० स्त्रिया आणि १२९ पुरुष मतदार एकूण टक्केवारी ६६.२५%, तर वार्ड क्र.९ मधून एकूण ४०७ मतदारंपैकी २८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये १५९ स्त्रिया आणि १२८ पुरुष मतदार आहेत. एकूण टक्केवारी ७०.५१%. आहे.
मतदान संपन्न झालेल्या 4 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चारही प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेचे एक उमेदवार असून प्रभाग क्रमांक 7, 8, 9 मधे काँग्रेसचे 3 उमेदवार उभे आहेत. 4 जागांसाठी एकूण 8 उमेदवार नशीब आजमावत आहेत.
म्हसळा नगर पंचायतीत शिवसेना, काँग्रेस पक्षाची युती आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शेकाप स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. अटीतटीच्या पार पडलेल्या निवडणुकीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांना मतदान करून घेण्यासाठी मोठी धावपळ सुरू होती.
म्हसळा नगरपंचायत निवडणूक 2022 चे 4 प्रभागांसाठी झालेले मतदान
प्रभाग क्रमांक - 2
एकूण मतदार 418
स्त्री 172
पुरुष 140
झालेले मतदान एकूण - 312
टक्केवारी - 74.64%
प्रभाग क्रमांक - 7
एकूण मतदार - 286
स्त्री 90
पुरुष 96
झालेले मतदान एकूण - 186
टक्केवारी - 65.03%
प्रभाग क्रमांक - 8
एकूण मतदार - 400
स्त्री 90
पुरुष 129
झालेले मतदान एकूण - 265
टक्केवारी - 66.25%
प्रभाग क्रमांक - 9
एकूण मतदार - 407
स्त्री 159
पुरुष 128
झालेले मतदान एकूण - 287
टक्केवारी - 70.51%
एकूण 74.69% मतदान झाले आहे.
सोबत फोटो -
म्हसळा नगर पंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक २ मधील आदिवासी वाडीवरील मतदारांचा उत्साह
Post a Comment