Pune Accident : मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार कंटेनरचा भीषण अपघात ; पाच जणांचा जागीच मृत्यू




टीम म्हसळा लाईव्ह
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला .
या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कार्ला फाटा सोडल्यानंतर रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरखाली ही कार घुसली. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर खाली अडकलेली गाडी व प्रवासी यांना बाहेर काढले. दरम्यान या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा