टीम म्हसळा लाईव्ह
दिनांक २६ |०१ |२०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन महिला संपर्क अध्यक्षा श्रीमती वंदनाताई कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालुकाध्यक्ष श्री. सुशांतभाई सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वडशेत वावे शाखा अध्यक्ष श्री संतोष शंकर शेट्ये यांनी गावातील व विभागातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता,या कार्यक्रमाला निमंत्रित महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालुका सचिव श्री.सुमित अंकुश सावंत साहेब यांनी उपस्थिती दाखवून महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली, या कार्यक्रमाला महिलांनी उस्फुर्त असा सहभाग देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्या बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन शाखा अध्यक्ष श्री संतोष शंकर शेट्ये यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले.
Post a Comment