मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. व परभणी महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 ते 18 या कालावधीत 68 व्या महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाणार होते.मात्र कोरोना वाढीने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच क्रीडांगणे तयार करण्याच्या निमित्ताने स्पर्धेच्या तयारीला जोरदार प्रारंभ झाला होता. या स्पर्धेकरिता देशाच्या विविध राज्यातून जवळपास 30 राज्यांचे संघ सहभागी होणार होते. पण सध्या देशात ओमायक्रोच्या कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाचे नियम अधिक कठोर केले असून, याची दखल घेत व खेळाडूंच्या सुरक्षितेचा गंभीर विचार करून राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी, सरचिटणीस आस्वाद पाटील व संयोजन समितीचे प्रमुख आमदार सुरेश वरपूडकर यांनी संपर्क करून स्पर्धा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर लवकरच स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील.-आस्वाद पाटील,राज्य सरचिटणीस
Post a Comment