भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख ( google-dougal-honors-fatima-sheikh)यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या डुगल प्रणालीद्वारे सन्मान केला आहे.
19व्या काळात भारतातील स्त्रीमुक्ती आणि दलितोद्धार चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे फातिमा शेख. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यात झाला. म. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक तथा शैक्षणिक कार्यातील प्रमुख सहकारी म्हणून त्यांचा उल्लेख प्राधान्याने करण्यात येतो.
इ.स. 1831 रोजी स्वदेशी ग्रंथालयाची स्थापना करत, त्याद्वारे मुलींना शिक्षित करण्याचे काम केले. अर्थातच तत्कालीन प्रबळ वर्गाकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. पण, सत्यशोधक समाजातील शेख यांनी या कडव्या विरोधाचा प्रतिकार करत आपले कार्य अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवले.
2014 साली भारत सरकारने फातिमा शेख यांच्या कार्यकर्तृत्वावर नव्याने प्रकाश टाकला, तसेच उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये ‘यशस्वी शिक्षक’ या शीर्षकाखाली त्यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
Post a Comment