● रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक यांचे विशेष सहकार्य तर शिक्षक मंगेश कदम यांनी घेतला होता पुढाकार
◆ समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी केली भौतिक सुविधांची पाहणी
म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसळा विद्यालयात युवा अनस्टॉपेबल या सामाजिक सेवाभावी संस्थेचे रायगड जिल्हा प्रमुख राजेश पुरोहित व नाना पालकर स्मृती समिती मुंबई परेल व्यवस्थापक तथा रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब मुले ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी भौतिक सुविधा पुरविण्याच्या हेतूने त्यांनी या विद्यालयातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, युरीन स्टॅन्ड, शौचालय, बाथरूम, हॅण्डवाॅश स्टेशन व सामूहिक पाणपोई यांचे आधुनिक पद्धतीनुसार नूतनीकरण करण्यात आले आहे. भौतिक सुविधा पूर्ण करणेकामी संस्थेच्या माध्यमातून अंदाजे अकरा लाख रुपये मदतनिधी देण्यात आली असून सदर काम पूर्ण झाल्यावर त्याची प्रत्यक्ष पहाणी रविवारी थोर समाजसेवक तथा रायगड भूषण कृष्णा महाडिक, राजेश पुरोहित, गणेश पंदेरे, विनोद लाड, अनंत पांचाळ मिस्त्री यांनी केली.
यावेळी शाळेचे शिक्षक वृंद ई.सी.पाटील, मंगेश कदम, चक्रधर चव्हाण, वसावे सर, कामडी सर, भायदे सर बंडगर सर, कर्मचारी देवमन घावटकाका उपस्थित होते.
विद्यालय परिसरातील भौतिक सुविधांचे काम परिपूर्ण होण्यासाठी बहुमोल योगदान या शाळेचे कर्तव्यदक्ष तथा आदर्श शिक्षक मंगेश कदम आणि दिलीप भायदे सर यांचे बहुमोल श्रेय होते. या भौतिक सुविधामुळे सर्व समाज स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याकामी रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक व राजेश पुरोहित तसेच युवा अनस्टॉपेबल संस्था व त्यांचे सहकारी वर्ग या सर्वाचे संस्थेच्या वतीने व विद्यालयाचे प्राचार्य पी.जे.मोरे तथा चेअरमन समीर बनकर व स्थानिक स्कूल कमिटी, पालकवर्ग, शिक्षक, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात येत आहेत.
◆ समाजसेवक कृष्णा महाडिक विद्यालयातील भौतिक सुविधांची पाहणी करताना सोबत अन्य मान्यवर
Post a Comment