नगरपंचायत पोलादपूरमध्ये भाजपचे उमेदवार म्हणजे मीच -आ.प्रवीण दरेकर



"'राज्य सरकारने केंद्राने दिलेला जनतेच्या विकासाचा निधी राजकीय आकसाने तसाच पडून ठेवला आहे."' - आ.प्रवीण दरेकर


टीम म्हसळा लाईव्ह
 "' राज्यसरकारने जनतेच्या विकासकामांसाठीचा पैसा मिळविण्यासाठी राज्याचा ठराविक निधी न दिल्याने राजकीय आकसाने अब्जावधीचा निधी तसाच पडून असल्याचा "' घणाघाती आरोप राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांनी केला. 
 
"' देशाचे केंद्रसरकारचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत राज्यात विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते म्हणून आपण कार्यरत असताना पोलादपूर नगरपंचायतीचा प्रत्येक भाजप उमेदवार म्हणजे मीच आहे, असे समजून पोलादपूरवासियांनी भाजप उमेदवारांना विजयी करावे, "' असे आवाहन आ.प्रवीण दरेकर यांनी केले.

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजी माने, रचना धुमाळ, प्रतिक सुर्वे आणि अंकिता जांभळेकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढून झाल्यानंतर आ.प्रवीण दरेकर यांनी आज दिनांक  १६ जानेवारी रोजी पोलादपूर येथे पत्रकारांसोबत झालेल्या वार्तालापा दरम्यान हि माहिती दिली.

यावेळी जिल्हा नेते बिपीन महामूणकर, गोरेगांव भाजपचे भालचंद्र तथा नाना महाले, तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, जिल्हा पदाधिकारी राजन धुमाळ, जयवंत दळवी, एकनाथ कासुर्डे, शहरअध्यक्ष राजाभाऊ दिक्षित तसेच पदाधिकारी आणि भाजपचे उर्वरित उमेदवार आदी उपस्थित होते.

"' पोलादपूर नगरपंचायतीच्या स्ट्रीटलाईटबाबत आक्रमक भाषा करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांना शिवसेनेने कसे उचलून नगराध्यक्ष केले आणि आंदोलनं आणि आक्रमक भाषा संपवली, याबाबत पोलादपूरकर जनता जाणून आहे. पोलादपूरमधील सत्ताधारी काय करताहेत, याबाबत पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना किती प्रश्न विचारण्याची गरज होती, याबाबत कोकणी पत्रकारांनी कोणते सवाल उठविले काय, "'  असा प्रति सवाल करीत आ.प्रवीण दरेकर यांनी यावेळी केले.

"'' राज्याचे नगरविकास मंत्री शिवसेनेचे असताना कोणत्या नगराध्यक्षांनी मोठया निधीसाठी मंत्रालयामध्ये मागणी करून निधी आणल्याचे दाखवून द्या, "' असे आव्हान  आ.दरेकर यांनी केले.

"'' नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलेल्या भाजप नगरसेवकांना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या भेटीला नेऊन पोलादपूरमधील राष्ट्रीय महामार्गविषयक समस्यांची मांडणी करून घेणार असल्याचे "' यावेळी आ.प्रवीण दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

"' पहिल्या टप्प्यात ज्याप्रमाणे पोलादपूर जनतेचा कौल दिसून आला तसाच दुसऱ्या टप्प्यामध्येही जनतेला मतदानाची इच्छा असल्याने भाजपच्या उमेदवारांना निवडून येऊन सत्तेची संधी मिळणार हे उघड सत्य असल्याने नियोजनपूर्वक विकास करून घेण्यासाठी आपण पोलादपूरमध्ये तळ ठोकून बसणार असल्याचे "'  यावेळी आ.दरेकर यांनी सांगितले. 

"' पोलादपूर नगरपंचायतीच्या विस्तारीकरणाचा मुद्दा जाहिरनाम्यामध्ये मांडण्यामागे पोलादपूर शहराची वाढ सर्वच बाजूंनी खुंटली असल्याने अनेक विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकते नसल्याचे दिसून आले असल्यानेच पोलादपूरकर मतदारांनी शिवसेनेला सत्ता दिली काँग्रेसलाही विरोधीपक्षाचे काम दिले आता भाजपाला संधी द्यावी, "' असे आवाहन यावेळी आ.प्रवीण दरेकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा