Education Council | मेंदडी केंद्राची माहे जानेवारी शिक्षण परिषद संपन्न



म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर

        जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायगड यांचे आदेशानुसार आज दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी म्हसळा तालुक्यातील मेंदडी केंद्राची शिक्षण परिषद अरबी समुद्राचे व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळा रोहिणी येथे केंद्र प्रमुख किशोर मोहिते यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
       सुरुवातीस शाळेच्या गीत मंचाने आपल्या सुरेख आवाजात ईशस्तवन व स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले तदनंतर शिक्षण परिषदेचे प्रस्ताविक मुख्याध्यापक भानुदास राठोड यांनी केले व विषय पत्रिकेनुसार शिक्षण परिषदेला सुरूवात झाली.
       शैक्षणिक विषय निपून भारत उपक्रम या विषयावर नरेश गायकवाड व अब्बास शेख यांनी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये निपुण चा अर्थ, त्याची व्याप्ती, यामधील विषयनिहाय घटक तसेच हा उपक्रम राबविणे याबाबतची कार्यवाही याची माहिती दिली. सदरचा विषय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अंतर्भूत असून लवकरच याबाबत अंमलबजावणी करण्यात  येणार असल्याने सर्व शिक्षकांनी सदरची माहिती घेतली.

 विषय क्रमांक 2 
दीक्षा ॲपची ओळख या विषयावर माहिती देताना प्रवीण सोनवणे सरांनी दीक्षा ॲप बद्द्ल सदर ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्याची पद्धत, ॲपचा शैक्षणिक वापर कसा करायचा, विद्यार्थ्यांना सदर ॲप कशाप्रकारे उपयोगी आहे. याची माहिती दिली सर्व शिक्षकांनी विद्यार्थी पालक यांच्या मोबाईल मध्ये दीक्षा ॲप डाऊनलोड करून शैक्षणिक प्रगती साधण्याची आवाहन केले. कोवीड काळात ॲपचा चांगल्याप्रकारे उपयोग होईल असेही सांगितले यामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसन करण्यात आले.
   विषय क्रमांक 3 
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन भाषा व बुध्दीमत्ता  विषयावर शशिकांत भिंगारदिवे व श्री भानुदास राठोड यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याने ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याची मुदत वाढली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसविण्याचे आवाहन केले. शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना विषय सोपा करून शिकवणे साठी नवीन क्लुप्त्या सांगितल्या.
  विषय क्रमांक 4 
केंद्र /राज्य/ जिल्हा/ तालुका स्तरावरील उपक्रम या विषयावर केंद्रप्रमुख किशोर मोहिते यांनी माहिती दिली यामध्ये डायट मार्फत राबविण्यात येणारा गोष्टींचा शनिवार, स्वाध्याय उपक्रम तसेच मराठी भाषा संवर्धन, अमृत महोत्सवी वर्ष निमित्त राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम, 100 दिवस वाचन अभियान, दाखल पात्र विद्यार्थी यादी, शाळा विकास आराखडा, ऑनलाइन कार्यशाळा, प्रशिक्षण याबाबत माहिती दिली व याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोवीड लसीकरण बाबत समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.
     विषय क्रमांक 5
 शैक्षणिक साहित्य निर्मिती या विषयाबाबत श्रीमती मुनव्वरी कोंडविलकर यांनी विविध शैक्षणिक साहित्याच्या आधारे सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले शैक्षणिक साहित्यामुळे आपली अध्ययन अध्यापन पद्धती प्रभावशाली होउन विद्यार्थी अध्यापनाकडे जास्त लक्ष देतात याचे उदाहरण देऊन भाषा गणित विज्ञान भूगोल या विषया मधील शैक्षणिक साहित्य तयार करून दाखविले व शिक्षकांना याबाबत मार्गदर्शन केले. अब्बास शेख यांनी googal Meet द्वारे ऑनलाईन अध्यापन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून घेतले तसेच आपण कोरोना काळामध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे सांगितले. शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित राहिले व चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आयोजक शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा