म्हसळा नगरपंचायत गटनेते पदी संजय कर्णिक यांची निवड


म्हसळा : नुकत्याच पार पडलेल्या म्हसळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनुसार आज दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. त्यामध्ये पक्षाचे गटनेते पदी संजय कर्णिक यांची एकमताने निवड करण्यात आली. म्हसळ्यातील एक संयमी, शांत आणि अष्टपैलू नेतृत्व त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, शिक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनुभवी म्हणून संजय कर्णिक यांची चांगली ओळख असून विरोधकांसह सर्वांचीच कामे तत्परतेने त्यांचा हातखंडा आहे. मावळत्या नगरपंचायतीमध्येही गटनेते पदासह प्र. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती अश्या माध्यमातून त्यांनी शहराच्या विकासासाठी चांगली कामगिरी केली आहे. गटनेते पदी निवड झाल्यावर त्यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले कि खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन मतदारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रमाणात विश्वास दाखविला असून या यशाचे संपूर्ण श्रेय खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचेच असल्याचे सांगितले.


खासदार सुनील तटकरे यांचे आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रियाजभाई घराडे यांचे अध्यक्षतेखाली गटनेता निवडीसाठी नवनिर्वाचित नगरसेवक संजय कर्णिक,संजय दिवेकर,नगरसेविका जयश्री कापरे, कमळ जाधव, सरोज म्हशीलकर, मेहजबिन दळवी, नौसीन चोगले, नगरसेवक सुनील शेडगे, असहल कादिरी, नगरसेविका फरहीन बशारत, सुमैया आमदानी, सारा म्हसलाई, शाहिद जंजिरकर यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या सभेत विद्यमान नगरसेवक संजय कर्णिक यांची एकमताने निवड करण्यात आली. संजय कर्णिक हे प्रभाग क्रमांक १६ मधुन ३२७ मत घेऊन दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत २० वर्षांचा प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव आहे. ग्रामपंचायत सदस्य ते नगरसेवक म्हणुन शहरात उत्कृष्ट काम केले आहे. मागील पाच वर्षाचे नगर पंचयतीत सत्तेत असताना कर्णिक यांनी गटनेता, उपनगराध्यक्ष तसेच बांधकाम, आरोग्य या विषय समितीचे सभापती पदी उत्कृष्ट काम केले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी अनुभवी पदाधिकारी म्हणुन संजय कर्णिक यांचे नावाला सर्वानुमते पसंती दिली असता शहर अध्यक्ष रियाज घराडे यांनी त्यांचे नाव जाहीर केले. गटनेते पदाचे निवडी वेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, महिला शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, माजी उपनगराध्यक्ष शोहेब हलदे, जेष्ठ पदाधिकारी सलीम चोगले, शहर युवक अध्यक्ष नईम दळवी, उपाध्यक्ष चंद्रकांत कापरे, यशवंत पवार, भाई बोरकर, मुबिन हुर्जुक, ताहीर भाई, सलीम बागकर, मंगेश म्हशीलकर, शैबाज घराडे, अब्दुल रहीम उकये, नदीम दळवी, कासीम मेमन, बशारत, सर्फराज वस्ता, फैसल घरटकर, रविंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी नवनिर्वाचित गटनेते संजय कर्णिक यांचे सह सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि सर्वांना जनसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा