शिवसेना बोर्लीपंचतन गटाच्या राजीनाम्याची लागण बागमांडले गटात लागण्याची शक्यता. तालुका प्रमुखांचा राजीनामा.
बोर्लीपंचतन ( श्रीनिवास गाणेकर)
श्रीवर्धन तालुका शिवसेनेत सध्या चालू तरी काय आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे विराजमान झाल्यानंतर आपोआप शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिकांमध्ये आनंदाचे माहुल पसरले. आपल्या विभागातील कामे आता प्राधान्याने होणार अशी आशा पल्लवित झाल्या मात्र आशाची निराशा झाली आहे. पुढील २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना पुन्हा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवेल अशी चिन्हे राहिली दुर तर बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या गटातील पदाधिकारी यांच्या राजीनाम्याची शाई सुकते न सुकते पाठोपाठ बागमांडला गटाला सुद्धा राजीनाम्याची लागण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामध्ये श्रीवर्धन शिवसेना तालुका प्रमुख प्रतोषभाई कोलधरकर हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
श्रीवर्धन मतदान संघ म्हणजे बँ. ए. आर. अंतुले यांचा काँग्रेसचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात अल्पसंख्याक मतदारांची संख्यावरच विधानसभा उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते. बँ. अंतुले यांनी याच श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शिवसेना भाजपा युतीचे सरकार असताना याच श्रीवर्धन मतदारसंघातील रहिवासी असणारे मनोहर जोशी सरांना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बसविले. मुंबईचा महापौर देवळे यांच्या सुद्धा याच मतदार संघातील रहिवासी आहेत. ईतके प्रचंड प्रेम बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणातील या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघा वरती होते. याच श्रीवर्धन मतदार संघाकडे नेतेमंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्ष केल्याने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी यांनी राजीनामा दिला तर दुसरा असणारा बागमांडला गटाला तालुका प्रमुखां सहीत राजीनाम्याची लागण लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्रीवर्धन तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट मोडतात. बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांनी संपूर्ण गटातील मिटींग घेऊन सामुदायिक राजीनामे दिली हिच परिस्थिती बागमांडला या जिल्हा परिषदेच्या गटातील पदाधिकारी विकास निधी न दिल्याने करणार असल्याचे दिसून येत आहे.
आता पुढे होऊ घातलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या आणि श्रीवर्धन पंचायत समितीच्या निवडणूकीत मतदारां समोर जाताना फार मोठे आव्हान उभे रहाणार आहे. समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार मोठ्या ताकदीने विकासकामे करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आमदार, आदितीताई तटकरे पालकमंत्री, ना. सुनीलजी तटकरे खासदार असे प्रबळ नेतृत्व, निधीला कमतरता नाही तर ईकडे श्रीवर्धन शिवसेनेच्या नेतुत्वावर नेतेमंडळींचे दुर्लक्ष, विकास निधी नाही या विवंचनेत सापडलेल्या पदाधिकारी यांनी राजीनामे सत्रे चालू केली आहेत. लवकरात बागमांडले गटातील तालुका प्रमुख प्रतोषभाई कोलथरकर हे सुद्धा राजीनामा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post a Comment