Celebrate Voters' Day | म्हसळ्यात मतदार दिन उत्साहात साजरा



म्हसळा (वार्ताहर)
मुख्य निवडणूक आयोगाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्या अनुषंगाने रायगड जिल्हा अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर व उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यामध्ये दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी तहसील कार्यालय, वनविभाग कार्यालय व पोलीस स्टेशन म्हसळा या सर्व कार्यालयातील अधिकारी आणी कर्मचारी यांनी शपथ घेऊन मतदान दिन साजरा केला.तसेच अंजुमन इस्लाम स्कुल म्हसळा, ज्युनिअर कॉलेज म्हसळा, आयडील स्कुल,व न्यू इंग्लिश व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे तहसीलदार समीर घारे यांचा उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यावेळी त्यांनी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे आव्हान केले. यावेळी  नायब तहसीलदार के टी भिंगारे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, पंचायत समिती सदस्य मधू गायकर, अब्दुक शकुर घनसार, प्राचार्य मोरे सर, प्राचार्य तांबे सर, प्राचार्य अमीन सर, रशीद सर, कदम सर, बांगिक मरुधदीन,महंमद मुदाशिर सर, काजी मदीया मॅडम, काजी मरिया मॅडम, मेमन मॅडम उपस्थीत होते.या स्पधेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा