आदगाव, कुडगाव येथील पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन
जनतेचे असलेले आमच्यावरील प्रेम हेच आमचे टॉनिक आहे जनतेच्या आशिर्वाद भक्कम असतील तर पुढेही अधिक चांगले कार्य हाती घेता येतील तर पुढील कालावधीमध्ये सागरी महामार्ग याच भागातून जाणार असल्याने या भागाला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगड चे खासदार सुनील तटकरे यांनी केले. श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव व कुडगाव येथील प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
पर्यटन विकास निधीमधून श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील पुरातन शिव मंदिरसाठी 15 लक्ष व कुडगाव येथील श्री गणेश, राम लक्ष्मण हनुमान शिवकालीन मंदिराच्या जिर्णोद्धार कामासाठी पहिल्या टप्प्यात 25 लक्ष रुपयेचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन रायगड चे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष सुचिन किर, अमित खोत, मंदार तोडणकर, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष हितायत कुदरते, आदगाव ग्रामस्थ उत्सव मंडळ अध्यक्ष अरविंद कोकाटे, आदगाव भंडारी समाजाध्यक्ष विवेकानंद मोरे , आदगाव कोळी समाजाध्यक्ष कृष्णा वाघे , आदगाव कुणबी समाजाध्यक्ष संदिप गोरीवले, आदगाव सरपंच लौकिता मोरे, उपसरपंच देवेन्द्र मोरे, अखंड कुडगाव कोळी समाजाध्यक्ष भास्कर पाटील, उपाध्यक्ष गणेश मेंदाडकर, कुडगाव सरपंच प्रमिला मेंदाडकर, उपसरपंच मुत्सरी हवालदार, भंडारी समाज, कुणबी समाज, कोळी समाज महिला मंडळ प्रमुख तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतामध्ये खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आध्यत्मिक विचारसरणी असलेले आपले राज्य आहे त्यामुळे मंदिर विकसित व्हावेत. भरडखोल, जीवना, आदगाव येथे आधुनिक पद्धतीने जेट्टी उभारण्यासाठी भारत सरकार कडे निधीची मागणी केली यामध्ये अर्धा हिस्सा महाराष्ट्र शासनाने उचलावा अशी मागणी भारत सरकारने केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्काळ पत्र देत यामध्ये 550 कोटी पैकी 275 कोटीचा अर्धा वाटा उचलला. ते पुढे म्हणाले की, श्रीवर्धन मध्ये समुद्र किनारा सुशोभीकरण केले उत्तम चौपाटी उभारली आता मारळ-हरिहरेश्वर व दिवेआगर समुद्र किनारा सुशोभित होतील असे पुढे टप्याटप्याने समुद्र किनारे सुशोभित होतील असे आश्वस्त केले. रेवस रेड्डी सागरी महामार्गाची कल्पना बॅ. अंतुलेची होती परंतु त्याला मार्गी लावण्याचे काम आपण करीत राज्याचे अर्थमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर ह्या महामार्गासाठी आर्थिक तरतूद केली आता या महामार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर दिघी ते या भागाचे महत्व वाढणार आहे. यातून रोजगार निर्मिती व पर्यटनाला विशेष महत्व देखील प्राप्त होईल, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिलेले शब्द पाळण्यास कोरोना मुळे उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे व याची कल्पनाही सर्वांना आहे यामध्ये इतरांनी आपल्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु आपण त्यास बळी न पडता विश्वास कायम ठेवलात असाच विश्वास कायम ठेवून पुढील काळामध्ये आपली वाटचाल राहो.
यावेळी श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागीय उपाध्यक्ष पदी परवेझ इब्राहिम मुकदम यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीचे पत्र खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते परवेझ मुकादम यांना देण्यात आले.
Post a Comment