तळा |किशोर पितळे | तळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीकाँग्रेसने शिवसेनेचा दारुण पराभवकेल्यानंतर विजयाचा गुलालअंगावर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांनी सर्वप्रथम रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे सुतारवाडी कार्यालय गाठले.तळा नगरपंचायतीत गेली वीस वर्षे शिवसेना पक्षाची सत्ता उलथवून शिवसेना उमेदवारांचा दारुण पराभव करीत विजय मिळवल्या नंतर रायगडचे खासदार सुनील तटकरेआणि आमदार अनिकेत तटकरे यांची त्यांनी सर्वप्रथम भेट घेतली व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा झालेला विजय हा तळा शहरातील सर्वसामान्य जनतेचा विजय असून तटकरे परिवाराने घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगून त्यांचे आभार मानले.
खास.सुनील तटकरे यांनीतळा तालुक्यातील विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्त्यांना कायमच ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तटकरे यांच्यावर असलेली निष्ठाहीचउमेदवारांच्या विजयासाठी सत्कारणी लागली आहे.नगरपंचायत निवडणुकीत ही त्याचा प्रत्यय आला. तळा शहरात गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश येत होते परंतु यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांचा पररेक्ट कार्यक्रम केला असून शहरातील विकासकामांचा बॅक लॉग भरून काढण्यात येईल असा विश्वास सर्वनगरसेवक पदाधिकारी यांना व्यक्त करून खा.सुनील तटकरे यांचे आभार मानले. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयामुळे भविष्यात तळा शहरातील राजकारणात मात्र यानिमित्ताने नक्कीच उलथापालथ पहायला मिळणार आहे.
Post a Comment