फोटो- वडवली गावातील या रस्त्यावर नुकतेच डांबरीकरण झालेल्या रस्त्याची पसरलेली खडी
लोणेरे - श्रीवर्धन तालुक्यातील वडवली - कुडकी - गोंडघर हे दीड कोटी रुपयांचे काम निकृष्ट असल्याचे सांगत डांबर मिश्रित खडी मध्ये डांबर अत्यल्प प्रमाणात असल्याची पोलखोलच वडवली ग्रामस्थांनी केली. कंत्राटदार वर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मात्र प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे कारवाई कंत्रातदारावर कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून हे दीड कोटींचे काम सुरू होते. आर के चांदनानी हे कंत्राटदार आहेत. पावसाळ्यापूर्वी खडी टाकण्यात आली होती त्यावर आता बीएम च थर टाकला जात आहे. डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बीबीएमचे काम अंतिम टप्प्यात आले असताना निकृष्ट बांधकामामुळे बीबीएम पूर्णत: उखडून रस्त्यावर गिट्टीचा पसारा पडल्याचे दिसत आहे. दुचाकी वाहन चालकांचा जीव संकटात सापडला आहे. शासनाने कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणावर खर्च होत असताना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही का टिकाव धरत नाही, हा चौकशीचा विषय आहे.
एकेरी बीबीएम पूर्ण झाले असतानाच बीबीएममधील खडी उखडून रस्त्यावर पसरलेली आहे. जुना रस्ता वाहतुकदारांना दिसत आहे. रस्त्यावरील बीबीएम पूर्णत: उखडला असून निकृष्ट बांधकामाचे पाप लपविण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत. ‘अंधेर नगरी, चौपट राजा’सारखी परिस्थिती या मार्गावर दिसून येत असल्याने वाहतुकदारांमध्ये कमालीचा असंतोष आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडली दिसत आहेत त्यामुळे दुचाकी खडी वरून घसरून दुर्घटना होऊ शकते.
- दीपक कांबळे, मा उपसरपंच, वडवली
वडवली कुडकी रस्त्याचे कित्येक वर्षांनी डांबरीकरण होत आहे मात्र वापरण्यात येणाऱ्या डांबर मिश्रित खडी मध्ये डांबरचे प्रमाण अत्यल्प आहे शिवाय ज्या दिवशी डांबरीकरण झाले त्याच वेळी कंत्राटदारांच्या कामगारां समोर निकृष्ट कामाची पोलखोल केली. अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी.- चंद्रकांत पाटील, सदस्य, आगरी समाज.
वर्षानुवर्ष वाट बघून रस्त्याची कामे होत असतात त्यात देखील निकृष्ट रस्ता नागरिकांच्या वाट्याला येतो. एका थरात डांबर मिक्स न करता ईमल्शन केमिकल वापरले जाते. परंतु या ठिकाणी ईमल्शनचा दर्जा निकृष्ट असल्याने दुसऱ्या दिवशी रस्ता उखडल्या गेला. शासकीय अभियंत्यांनी साहित्याची गुणवत्ता तपासून रस्त्याचे काम करून घ्यावे. पुन्हा अशा प्रकारचे काम निदर्शनास आल्यास मनसे कडून कारवाई करण्यात येईल.
- सुशांत सुधीर पाटील, मनसे, तालुका अध्यक्ष - श्रीवर्धन.
Post a Comment