संजय खांबेटे : म्हसळा
गेले काही दिवस ऐन थंडीत म्हसळाकर देत आहेत विचीत्र हवामानाला तोंड. कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी, तर कधी प्रचंड धुके.आज म्हसळ्यात दिवसभर होती संध्याकाळ तर सायंकाळी अचानक पाऊस सुरु झाला असे विचित्र हवामान आहे. आजच्या पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणा मुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. आधी निर्सग नंतर तोक्ते वादळात आंबा व काजू बागायतदारांना मिळत असलेल्या आर्थिक फटक्यामुळे त्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साधारणत: पाऊस आटोक्यात आल्या नंतर दसरा, दिवाळी या सणांमध्ये आंबा-काजू बागायतदारांमध्येव्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते.त्यानुसार नवीन बागा विकत घेणे किंवा करारावर घेणे तसेच जुन्या बागांचा करार वाढवून घेणे आदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता घेतलेल्या बागांची स्वच्छता करणे, आंबा कलमांवर आलेली बांडगुळे काढणे अशी कामे बऱ्यायपैकी खर्चिक असतात.काही ठिकाणी आंबा कलमांवर औषधांची पहिली फवारणी झाली असून काही बागांमध्ये औषध फवारणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कित्येक स्थानिक तरुण, मध्यमवयीन पुरुष - महिला बागांमध्ये राबत आहेत. हे सर्व चालू असताना अवकाळी पावसाने आज जिल्ह्यात हजेरी लावल्याने बागायतदारां पुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. रायगडच्या आंबा बागायतदारांची शासना कडून उपेक्षा होत आहे. जिल्ह्यांत १६ हजार ४१६ हेक्टर मध्ये आंबा, तर २ हजार८०० हेक्टर मध्ये काजू पिक घेतले जाते. आंबा-काजू पिके जिल्ह्याचे तुलनेत सर्वात जास्त पिक श्रीवर्धन मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव आणि रोहा या तालुक्यांत होते. मतदार संघात आंबा ८ हजार ६०० हेक्टर, काजू २ हजार ३८४ हेक्टर मध्ये क्षेत्र आहे. हवामान आधारीत आंबा पिक विमा हप्ता कोकणातील रत्नागिरी रु १३३ प्रति झाड(आंबा कलम), सिंधुदूर्ग कंपनी रु ७० प्रति झाड(आंबा कलम), पालघर रु२०३ प्रति झाड (आंबा कलम)ठाणे रु२१७ प्रति झाड (आंबा कलम) असे असताना रायगड जिल्ह्यातील बागायतदारांसाठी रु२९४ प्रति झाड(आंबा कलम) असा चौपट जास्त आहे. याकडे स्थानिक लोकप्रतीनिधी दुर्लक्ष करतात. त्यामुळे रायगड मधील आंबा बागायतदार शासनावर प्रयंड नाराज आहेत.
Post a Comment