म्हसळाकरानो सावधान…! करोना वाढतोय…मात्र काळजी करू नका..काळजी घ्या..!



म्हसळयात कोरोनाची तीसरी लाट :
रुग्णसंख्या आहे ९
संजय खांबेटे : म्हसळा 
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.दिवसें दिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात दि. ७जानेवारी २०२२ च्या कोविड अहवालानुसार या एकाच दिवशी तब्बल १हजार ७१४ नव्याने  करोना रुग्णांची नोंद झाली आहे. बरे झालेले १४२, मृत २ ( १ पनवेल मनपा, व १ पेण) आहेत, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण ५१२७ आहेत ,म्हसळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे.तालुक्यात आज रोजी ५  रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती म्हसळा तालुका आरोग्य अधिकाऱ्यानी प्रसीध्दी पत्रकांत दिली आहे.तालुक्यात आज उपचार सुरु असलेल्या बाधीतांची संख्या ९ आहे. तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधीतांची एकूण संख्या १०३५ झाली आहे.कोरोनामुळे एकूण मृत ५४, तर एकूण बरे झालेले रुग्ण ९७२आहेत. आजचे बाधीत रुग्णांत बहुतांश रुग्ण ३० ते ५५ वयोगटांतील आहेत,त्यामध्ये काळसुरी २,वारळ१,खरसई १, म्हसळा शहर१ असे ५ रुग्ण आहेत.उपचार घेणारे अन्य रुग्ण पुढील गावांतील आहेत.सोनघर, ठाकरोती, लिपणीवावे, चिखलप असेआहेत.बहुतांश रुग्ण गृह विलगी करणात (Home Isolatation) आहेत.

"तालुक्यांत जास्तीत जास्त नागरिकांच्या कोविड तपासण्या कराव्यात, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर तातडीने दंडात्मक निपक्षपाती कारवाई करावी." 

"मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे, या सूचनांचे प्रत्येक नागरिकानी पालन करावे" 
समीर घारे, तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, तालुका म्हसळा .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा