संजय खांबेटे : म्हसळा
मागील २-४ दिवस म्हसळ्यात आणि शहर व परीसरांत सर्वत्र शुभ्र धुक्याची चादर पसरलेली दिसत होती. दाट धुक्यामुळे सूर्यकिरणेही पृथ्वीवर उशिरानेच पोहोचतात त्यामुळे नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत हाते. म्हसळा शहराचे लगतच्या म्हणजे म्हसळा वाडांबा, बायपास्ट ,सावर रस्ता,पाभरे -खारगांव रस्ता या परिसरांत दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव आज पायी चालणाऱ्यानी घेतला.या वेळात धुक्यामुळे पायी चालणाऱ्याना आपल्या मोबाईल टॉर्चचा वापर करून धुक्यातून मार्ग काढावा लागला. सकाळी ७.३० पर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते.वाहनांचे दिवे सुरू ठेवण्या शिवाय चालकांसमोर आज पर्याय नव्हता.
"धुक्यात चालत असाल तर आरोग्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.याची काळजी घेणे महत्वाचे आहे. वातावरणातील आर्द्रते श्वासो च्छ्वास,दमा आणि छातीत दुखणे असे आजार असणा ऱ्यानी दाट धुके आसल्यास धुक्यात चालण्यास जाऊ नये".
डॉ.श्रीमती देशमुख, म्हसळा
Post a Comment