श्रीवर्धन तालुक्यातील मौजे कुणबीवाडी गावच्या सुपूत्राने क्रिडाक्षेत्राच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा.. गोल्ड मेडल पटकाऊन केले समाज्याचे नाव रोशन.....
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे कुणबीवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री सुधीर पाखड यांचा जेष्ठ चिरंजीव सुदर्शन यांनी दिल्ली येथील क्रिडाक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला.
कर्तुत्वाला आणि धेय्याला मेहनतीची जोड लाभली की यश हमखास गवसतेच अश्याच एका खेड्यात जन्मलेल्या तेथील मातीत तयार झालेला सितारा राष्ट्रीय पातळीवर चमकला.कठोर परिश्रमाने आणि चिकाटीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या क्रिडा क्षेत्रात मानाचा शिरपेचात तुरा रोवला.
दिल्लीयेथील क्रिडा खेळात दहा किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकाऊन गोल्ड मेडल, ट्राफी व प्रशस्तीपत्र मिळवणारा तालुक्यातील खेडे गावातील पहिला मुलगा त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
ही वार्ता समजताच समंधीत नातेवाईक तसेच कुणबीवाडी,आतगाव आणि परिसरातील नागरिकांनी त्याचे जल्लोषात, शाल, प्रतिमा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
Post a Comment