‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी अर्ज करा; जिल्हा महिला व बाल विकास अधिकार्‍यांचे आवाहन

सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या नावे 5 राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्काराचे नाव ‘नारी शक्ती पुरस्कार’ असून 3 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार 8 मार्च जागतिक महिला दिनी केंद्र शासनातर्फे दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

पुरस्काराचे निकष

  • पुरस्कारतील महिलेचे वय 25 वर्षे पूर्ण असावे.
  • नारी शक्ती पुरस्कार हा वैयक्तिक तसेच संस्था स्तरावर देण्यात येतो.
  • विधवा, परितक्ता, निराधार, अपंग महिलांचे पुर्नवसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहे, त्या महिला या पुरस्कारासाठी पात्र आहेत.
  • शैक्षणिक, प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र व महिला स्वावलंबन या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे, तसेच शेतीव्यवसायत काबाड कष्ट करणार्‍या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे श्रम कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. अशा महिला या पुरस्कारासाठी पात्र आहेत.
  • सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा, यासाठी ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत, अशा महिला सदर पुरस्कारासाठी पात्र आहेत.

याप्रमाणे कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, कांगो पुरस्कार, माता जिजाबाई पुरस्कार, राणी गार्डीनलो झेलिंग पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तसेच राणी रुद्रमादेवी पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कारासाठीचे अर्ज हे इंग्रजीमध्ये 31 जानेवारी 2022 पर्यंत केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.

 अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा