भाजपाचे कमळ फुलले,तर शिवसेनेचा सुपडा साफ..
एक हाती सत्ता दिल्याबद्दल तळेवासियांचे जाहीर आभार आ.अनिकेत तटकरे.
तळा: किशोर पितळे
तळा नगरपंचायतनिवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे खा.सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं १७ पैकी १० जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं १०, शिवसेना २, भाजपा २ शिवसेना पुरस्कृत अपक्ष २, भाजपा पुरस्कृत १ अशा जागा जिंकता आल्या आहेत.१७ जागा असलेली तळा नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे१३ जागांवर मतदान २२डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत ४ जागांसाठी काल मतदान झालं.गेल्या वेळी१३ जागां पैकी जोगवाडी येथील उमेदवार मंगेश पोळेकर बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे १२ जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तळा नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.सुनील तटकरे व शिवसेनेचे मंत्री ना.सुभाष देसाई या दोन नेत्यांसाठी हीनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.तळा नगरपंचायतीवर खा.सुनील तटकरे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर विश्वास ठेऊन तळेवासियांनी गेली२०वर्षे असणारी शिवसेनेची सत्ता उलथवून लावली.त्याबद्दलसर्व मतदारांचे आभार आ.अनिकेत तटकरे यांनी मानले व येणाऱ्या पाच वर्षात तळेवसियांना अपेक्षित असणारा विकास आपण पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.त्याच प्रमाणे या विजयाने उतू नका मातू नका, आपल्याला जमीनीवर राहून जनतेची सेवा करायची आहे असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपाचे कमळ फुलले..तीन जागांवर विजयाचा मोहर..
भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार तळा नगरपंचायतीत निवडून गेले तर, प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपा उमेदवार दिव्या रातवडकर यांना ११७ मतदान मिळाले.शेकापच्या केतकी टिळक यांना ९९ मते मिळाली, शिवसेनेच्या उमेदवार प्रविणा चांडिवकर या तिसऱ्या नंबरवर राहिल्या, त्यांना अवघी ५८ मते मिळाली, तर दिव्या रातवडकर या १८मतांनी विजयी झाल्या आहेत.प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपा उमेदवार सविता जाधव यांनी शिवसेना उमेदवार सुरेखा पवार यांचा १३२ मतांनी पराभव केला आहे, तर प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपा पुरस्कृत उमेदवार रितेश मुंढे यांनी विजय मिळवला असून राष्ट्रवादी शिवसेना अपक्ष उमेदवारांना मागे टाकत५१ मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.
शिवसेना उमेदवाराचे डिपॉजीट जप्त...
प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना उमेदवार सुलोचना कटे यांचे डिपॉजीट जप्त झाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ.अस्मिता भोरावकर यांनी त्यांचा १४५ मतांनी दारुण पराभव केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार विजयी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार विजयी झालेत. प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रिष्मा बामणे यांनी शिवसेनेच्या शुभांगी मांडवकर यांचा ५६ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या यामिनी मेहतर यांनी शिवसेनेच्या विद्या तळेकर यांचा ५० मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा नागे यांनी शिवसेनेचे दयानंद जानराव यांचा केवळ एका मताने पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश शिगवण यांनी शिवसेना,भाजपा, शेकाप यांना मागे टाकत ५४ मतांनी विजय संपादन केला आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत रोडे यांनी शिवसेनेचे गुरुदास तळकर आणि भाजप चे सुधीर तळकर यांना मागे टाकत ८८ मतांनी विजय मिळवला आहे.प्रभाग क्रमांक १२मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश पिसाळ यांनी शिवसेनेचे महेंद्र महाडकर आणि शेकापचे लहू चव्हाण यांना मागे टाकत ६ मतांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना तांबे यांनी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष यांना मागे टाकत ३० मतांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी घोलप यांनी शिवसेनेच्या कविता गोळे यांचा ४६ मतांनी पराभव केला आहे.
शिवसेना केवळ तीन प्रभागात विजयी
शिवसेनेला यावेळी निवडणुकीत दारुण पराभवास सामोरे जावे लागले. केवळ तीन उमेदवार निवडून आले आहेत, यामध्ये दोन उमेदवार शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत तर दोन उमेदवार शिवसेना पुरस्कृत आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेश सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश सकपाळ भाजपाचे सुबोध भौड यांना मागे टाकत१७ मतांनी विजय मिळवला.प्रभाग क्रमांक ४मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिराज खाचे यांनी अपक्ष उमेदवार तब्सुम दांडेकर आणि अहमदी मुल्ला यांचा ११८ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक६मध्ये शिवसेनेच्यानेहा पांढरकामे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्या वडके यांचा १२ मतांनी पराभव केला आहे.प्रभाग क्रमांक ७ शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश पोळेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
Post a Comment