Crime News | ॲड. काशिनाथ ठाकूर यांची बदनामी करणारे त्रिकुट गजाआड


.... मुख्य सूत्रधार उमेश ठाकूर 

मंजुळा म्हात्रे  ( प्रतिनिधी )

ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्या नावाचा फेक फेसबुक अकाउंट बनवून, अश्लीस चॅटिंग व चित्रफीत बनवून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

 सदर गुन्हा महिलेच्या संदर्भात असल्यामुळे या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक अशोक दुधे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम व या गुन्ह्यातील तपासी अंमलदार एस. डी. सणस यांच्या कडे तक्रार करण्यात आली होती.

त्या प्रमाणे तपासी अंमलदार यांनी सायबर सेल शाखा रायगड- अलिबाग यांची मदत घेऊन काशिनाथ ठाकूर या नावाने असलेल्या फेसबुक बाबत फेसबुक कंपनी कडून माहिती प्राप्त केली असता शुभंम जगदीश गुंजाळ हा आरोपी असल्याचे निष्पण झाले. शुभंम गुंजाळ यांच्याकडे या गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशी केली असता ॲड. उमेश मधुकर ठाकूर रा. अलिबाग हे रेतीचा व्यवसाय करत असून त्यांच्या रेतीच्या धंद्याबाबत ॲड काशिनाथ ठाकूर यांनी वेगवेगळ्या कार्यलयात तक्रारी केल्यामुळे ॲड. उमेश ठाकूर यांनी फिर्यादी मनीषा रामचंद्र चोर्डेकर व आरोपी शुभंम जगदीश गुंजाळ यांना हाताशी धरून हा कट रचून ॲड. काशिनाथ ठाकूर यांची बदनामी केल्याचे निष्पण झाले.

सदरील गुन्ह्यातील तीनही आरोपीना अटक करण्यात आली असून दिनांक १४ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. तर या गुन्ह्याचा सूत्रधार ॲड. उमेश ठाकूर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यातील अधिख तपास पो. निरीक्षक सणस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा