मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतले फळसप सोमजाई जाखमातेचे दर्शन

टीम म्हसळा लाईव्ह
मनसेचा ढान्या वाघ तसेच ठाणे जिल्हा मनसे आक्रमक नेता म्हणून ओळख असलेले अविनाश जाधव यांनी नुकतीच आंबेत खाडीपट्टा विभागातील फळसप येथील आई सोमजाई जाखमाता देवीच्या उत्सवानिमित्त भेट दिली .
यावेळी ठाणे शहर उपाध्यक्ष पुष्कर विचारे म्हसळा श्रीवर्धन माजी संपर्क अध्यक्ष शेखर सावंत , राष्ट्रवादी युवा नेतृत्व अभिषेक दाजी विचारे , बिग बॉस फेम दादूस हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते . अविनाश जाधव फळसप येथे येण्याची बातमी मनसैनिकांना कळताच फळसप येथे त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी झाली होती 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा