म्हसळे तालुक्यातील १०० % लसीकरण करणारी पहीली ग्रामपंचायत ठरली काळसुरी


म्हसळे तालुक्यातील १०० % लसीकरण करणारी पहीली ग्रामपंचायत ठरली काळसुरी
सकारात्मक सहकार्याने अन्य लक्ष्य करणार पूर्ण.

संजय खांबेटे : म्हसळा 
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करून घेण्यात आले.त्यानंतर शासनाने १५ ते १८ वयोगटातील किशोर वयीन मुलांचे लसीकरण सुरु केले आणि बघता बघता सर्वांचे सहकार्याने आमची काळसुरी ग्रामपंचायत १00 % कोविड प्रतिबंधत्मक लसीकरण झालेली म्हसळा तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असे प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीच्या वैद्यकिय आधिकारी डॉ.पूजा डोंगरे यानी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. सकारात्मक सहकार्याने अन्य लक्ष्य पूर्ण करणार हे सांगताना डोंगरे यांच्यात आपल्या सहकाऱ्यांबद्दल प्रचंड आत्मविश्वास आसल्याचे जाणवत होते. त्यानीआम्ही १५ ते १८ वयोगटातील किशोर वयीन मुलांचे शाळेतच लसीकरण करताना ग्रामपंचायत सरपंच, प्रतिष्ठित मंडळी,केंद्रप्रमुख, स्थानिक शिक्षक,सर्कल, तलाठी, अंगणवाडी सेविका- मदतनीस पोलीस पाटील, कोतवाल, यांच्या सहकार्याने संपूर्ण गावांत लसीकरणाबाबत सकारात्मक व एकसंधपणे केलेल्या जनजागृती मुळे हे यश आल्याचे सरपंच सौं अरुणा नाक्ती यानी सांगितले. ग्रामपंचायत हद्दींत१५ते १८ वर्षावरील लाभार्थी २९ आणि १८ वर्षावरील लाभार्थी ५७८ आहेत. यावेळी १५ ते १८ वर्षामधील २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व किशोर वयीन शाळबाह्य मुलांचे लसीकरणावर सुद्धा आरोग्य विभागाचे बारकाईने लक्ष होते. हे उद्दीष्ट १०० % पूर्ण झाले आहे.
  प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी अंतर्गत मेंदडी, वारळ, खरसई ही ३उपकेंद्र, १० ग्रामपंचायत आणि १६ गाव/ वड्या येतात त्यामध्ये तोंडसुरे, रेवली, तुरुंबाडी, रोहिणी हया ग्रामपंचायत चे कोविड प्रतिबंधत्मक लसीकरण ९५% पेक्षा जास्त झालेले आहे तर वरवटणे, खरसई, मेंदडी, गोंडघर वारळ,हया ग्रामपंचायत अजून काही प्रमाणात लसीकरणात मागे आहेत.तालुका आरोग्यआधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्श नाने  उर्वरीत लक्ष्य पूर्ण करण्यात येईल असे प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा डोंगरे यांनी सांगितले.

१०० % लसीकरणाचे हे आहेत शिलेदार.
"डॉ प्राजक्ता पोटे, डॉ चारुशीला गायकवाड,श्रीम विमल पोटफोडे, दीपिका दिवेकर, दीपिका वाणी, प्रविना ढंगारे, अरुण कोल्हे, निवळकर, जयकृष्ण वेटकोळी, बंडू ढोले, बाळकृष्ण पाटील, दीपेश अंदेकर,योगेश पालेकर, कृष्णा पाटील "

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा