म्हसळा सार्वजनीक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.



(म्हसळा प्रातिनिधी) म्हसळा सार्वजनीक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी करण्यात आली यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते , विनोद सोनवणे,सुजय कुसळकर,धनजय सरनाईक, दामोदर गुरव, निखिल पाटील, प्रशांत करडे,उदय करडे, ग्रंथालय कर्मचारी दिपाली दातार,सायली चोगले व अन्य वाचक वर्ग उपस्थित होता.यावेळी वाचना लयाचे सदस्य विनोद सोनवणे यानी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे बाबत गौरोद्गार काढताना सावित्रीबाईनी आपले पती महात्मा जोतिराव फुले यांच्यासमवेत केवळ कार्य केले नाही, तर तत्कालीन समाजातील बालहत्या प्रतिबंध,विधवा महिलां ची बाळंतपणे, केशवपनासारख्या कुप्रथांविरोधात चळवळी, आंदोलने उभारून चळवळींचे नेतृत्वही केलेे, त्यामुळेच आज स्त्रियाना ५० % आरक्षण मिळते, शिक्षणातही मुलीनी प्रचंड प्रगती केली आहे आसे सोनावणे यानी सांगितली.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा